IMPIMP

PM Narendra Modi On Fuel Price | महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं…

by nagesh
PM Narendra Modi On Fuel Price | why not reduction in petrol and diesel prices in the states narendra modi asks chief ministers meeting on corona

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Narendra Modi On Fuel Price | कोरोनाच्या (Corona) वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (बुधवारी) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. बैठकी दरम्यान बोलताना लहान मुलांना कोरोना लस (Corona Vaccination) उपलब्ध झाली असून राज्यांनी आता लसीकरणावर लक्ष केद्रीत करावे, असा आदेश मोदींनी दिला. त्यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या इंधन किंमतीच्या (Fuel Price) पार्श्वभूमीवर राज्यांना सुनावले. (PM Narendra Modi On Fuel Price)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”विरोधी पक्षांनी ज्या राज्यात सत्ता आहे त्यांनी आपल्या राज्यातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel Price) कमी झालेल्या किंमतीचा लाभ दिलेला नाही. या राज्यांनी इंधनाच्या किमतीत कपात केली नाही. व्हॅट (VAT) कमी न करता या राज्यांनी केवळ लाभ मिळवला आहे. जागतिक संकटाच्यावेळी राज्यांनी आणि केंद्राने एकत्र येऊन पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. तसेच मोदींनी ज्या राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला नाही त्यांची महाराष्ट्रासह (Maharashtra State Government) संबधित राज्यांची नावे घेतली आहेत.

दरम्यान, दिवाळीच्या कालावधीत केंद्राने इंधनाच्या दरात 5 रुपयांनी घट केली होती.
त्यानंतर भाजप (BJP) शासित राज्यानेही इंधनाचे दर कमी करुन एक दिलासा दिला होता.
ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तेथे इंधनाचे दर इतर राज्यापेक्षा कमी आहे.
परंतु, महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कपात केली नव्हती. केंद्राने जेवढा दर कपात केला होता,
तेवढाच तो दिलासा मिळाला. याच मुद्याला अनुसरुन पंतप्रधान मोदींनी संबधित राज्यांना सुनावले आहे.

Web Title :- PM Narendra Modi On Fuel Price | why not reduction in petrol and diesel prices in the states narendra modi asks chief ministers meeting on corona

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना नवी उपाधी; ‘हिंदू जननायक’ म्हणून औरंबादमध्ये झळकले बॅनर !

Sun Charged Water | सूर्याच्या प्रकाशात ठेवलेले पाणी बनते अमृत, आयुर्वेदाने सांगितले आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

Airtel Payments Bank FD | एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक देतेय अधिक व्याज आणि सुविधाही

Related Posts