IMPIMP

PM Narendra Modi | देशात पुन्हा लॉकडाउन लागणार? PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

by nagesh
PM Modi Visits To Pune Mahapalika Bhavan | The Prime Minister Narendra Modi will come to Pune Mahapalika Bhavan but due to this reason many corporators including the ruling BJP are offset

नवी दिल्ली : वृत्तसंंस्था PM Narendra Modi | देशातील कोरोना (Coronavirus) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (गुरुवारी) वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक आज दुपारी ऑनलाइनद्वारे पार पडणार आहे. राज्यांतील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठा मिळावा आणि अन्य औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार (Central Government) देखील लसीकरणाबाबत काही निर्देश देणार असल्याची आणि निर्बंधांबाबत या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महत्वाचे म्हणजे पुन्हा निर्बंध (Restrictions) कठोर करण्याबरोबरच देशभरात लॉकडाउन लावण्याच्या शक्यता बाबतची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज दुपारी 4.30 च्या दरम्यान, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. तर, यामध्ये 19 राज्यांमध्ये 10 हजाराहून जादा ओमायक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल (Lav Agarwal) यांनी बुधवारी दिली होती. त्यामुळे आता पंतप्रधान काय निर्णय घेणार? याकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे.

या बैठकीत केंद्र सरकारकडून कठोर निर्बंधांबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
निर्बंध कठोर करण्याबाबत चर्चा करुन त्याबद्दल महत्वाचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे.
तर, या बैठकीमध्ये लॉकडाउनबाबत विचार केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे.
परंतु, यासंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधानच घेतील असं देखील म्हटलं जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर्सची संख्या, आयसीयू बेड्सची संख्या, पीएसए यंत्रणा, ऑक्सिजन बेड्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या, लसीकरणाची सद्यस्थिती यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title :- PM Narendra Modi | pm modi to hold high level meeting with all state cms amid covid situation

हे देखील वाचा :

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल 50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

Pune Crime | चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron च्या धोक्यादरम्यान Bus किंवा Auto ने प्रवास करत असाल तर व्हा सावध ! कोरोनाचा धोका ‘या’ 6 पद्धतीने करा कमी

Related Posts