IMPIMP

PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?

by nagesh
PM Narendra Modi | why ajit pawar not to get chance to speak pm narendra modi visit to dehu mandir

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (मंगळवार) देहूत शिळा मंदिराचं (Shila Mandir) लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारले गेले. यावेळी मोदींनीही ‘अजितदादांना बोलू द्या’ असा इशारा केला. पण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेत्याने ते भाषणासाठी डायस कडे गेले. या कार्यक्रमासाठी राज्य सरकारचे (State Government) प्रतिनिधी (Representative), राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. पण असं असतानाही त्यांना बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देहूत आले होते. यावेळी त्यांनी शिळा मंदिराचे लोकार्पण केले. त्यानंतर सभा स्थळी आले. त्यांच्यासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) होते. स्टेजवरही हे नेते उपस्थित होते. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालं. त्यानंतर मोदींच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. नंतर सूत्रसंचालकाने भाषणासाठी मोदींचं नाव पुकारलं. तेव्हा मोदींनी अजित पवार भाषण करायचे राहिले असल्याचे हाताने खुणावलं. पण अजितदादांनी तुम्ही भाषण करा, असं सांगितलं. भाषणासाठी नाव जाहीर झाल्यामुळे मोदींना उठावं लागलं. पण भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला. परंतु सरकारचा प्रतिनिधी म्हणून अजित पवार यांचं भाषण झालंच नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भाषणाची सुरुवात मराठीतून
मनुष्य जन्मात सर्वात दुर्मिळ गोष्ट असेल तर संतांचा सत्संग. आपल्या शास्त्रातही ते सांगितले आहे. संतांची कृपा, अनुभूती झाल्यावर देवाची अनुभूती होत असल्याचा अनुभव आपोआप होतो. मीही इथे हीच अनुभूती घेत आहे. देहू हे संत शिरोमणी जगद्गुरु तुकारामांचं (Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj) जन्मस्थळ आहे. तसेच कर्मस्थळ. देहूत पांडुरंगाचं वास्तव्य आहे. इथले लोक भक्तीने ओतप्रोत भरले आहेत. संत स्वरुप आहेत. त्यामुळे तुम्हाला वंदन करतो, असं म्हणत मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.

पालखी मार्गासाठी 11 हजार कोटी
काही दिवसांपूर्वींच मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय महामार्गाचं (National Highway) फोरलेनचं भूमिपूजन करण्याची संधी मिळाली.
ज्ञानेश्वर पालखी मार्गाचं पाच टप्प्यात काम होणार आहे. तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम तीन टप्प्यात होणार आहे.
या सर्व टप्प्यात 350 किलोमिटर लांबीचे हायवे मार्ग होणार आहेत. या कामासाठी 11 हजार कोटीहून अधिक खर्च येणार आहे.
यामुळे विकास होणार असल्याचे मोदींनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही दडपशाही, सुप्रिया सुळेंचा आक्षेप

मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉल साठी अजित पवारांचं भाषण व्हावं म्हणून महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) पीएमओला (PMO) विनंती केली होती.
पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाही. हा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) अन्याय आहे.
आमच्या राज्यातील आमचा नेता व्यासपीठावर आहे.
तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्याला भाषण करु देत नाही. ही दडपशाही आहे.
आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. दुर्दैवी आहे.
प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,
अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी व्यक्त केली.

 

Web Title :- PM Narendra Modi | why ajit pawar not to get chance to speak pm narendra modi visit to dehu mandir

हे देखील वाचा :

Supriya Sule | PM मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Chandrakant Patil | ‘… पण उमेदवार कर्तुत्ववान आणि न्याय देणारा असावा’ ! राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीच्या चर्चेवरुन चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला

Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!

Related Posts