IMPIMP

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration's request to L&T (L&T) company, which has been digging for 24 hours water supply scheme in the last 2 years?

पुणे : सरकारसत्ता – PMC Development Plan For The Merged 23 Villages | महापालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) सामविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमधील ड्रेनेज लाईन (Drainage Line) तसेच एस.टी.पी. प्लांटस् (STP Plant In Pune) उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी मे. प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंन्सल्टंट प्रा.लि. (PriMove Infrastructure Development Consultants Pvt. Ltd) या सल्लागार कंपनीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. (PMC Development Plan For The Merged 23 Villages)

महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भौगोलिक स्थानानुसार २३ गावांचे काम दहा पॅकेजेस मध्ये होणार आहे. पाणी पुरवठ्यापाठोपाठ महापालिकेने या गावांतील ड्रेनेज लाईनच्या कामाचेही नियोजन केले आहे. या गावांचे क्षेत्रफळ १८४ चौ.कि.मी. आहे. या गावातील सध्या अस्तित्वातील ड्रेनेज लाईनचे सर्वेक्षण करणे. अस्तित्वातील ज्या लाईन्स तातडीने बदलायच्या आहेत त्याच्या वेगळ्या नोंदी, पुढील १५ वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून अस्तित्वातील लाईन्सची क्षमता तपासणे व बदलणे आणि तिसर्‍या टप्प्यात पुढील तीस वर्षांसाठी होणारी संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून तपासणी करणे व बदलणे असे तीन टप्प्यातील सर्वेक्षण होईल.

यासोबतच आवश्यक तेथे नवीन मैलापाणी प्रक्रिया उभारणे (PMC Sewage Treatment Plant),
पंपिंग स्टेशनची उभारणी (PMC Pumping Station) करण्याचीही कामे करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
यासाठी सल्लागार नेमण्याकरिता बी २ पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या होत्या.
तीन सल्लागार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी दोन पात्र ठरल्या असून यापैकी मे.प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर
डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रा.लि. यांची ३ कोटी ८८ लाख रुपयांची सर्वात कमी दराची निविदा आली आहे.

Web Title :- PMC Development Plan For The Merged 23 Villages |
Consultants will be appointed for drainage line work in 23 villages Pune Municipal Corporation PMC

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Maharashtra Municipal Election | पुणे (PMC), पिंपरी-चिंचवड (PCMC), ठाणे (TMC Thane), नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली (KDMC), कोल्हापूरसह 13 मनपांच्या निवडणुकांसाठी ‘या’ दिवशी होणार आरक्षण सोडत

V Mart Story | कर्ज घेवून सुरू झालेले फोटोकॉपीचे दुकान ते 1000 कोटीची कंपनी, जाणून घ्या कसे उभे राहीले व्ही मार्ट

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

Related Posts