IMPIMP

PMC Draft ward Structure | पुणे महापालिका निवडणूक ! हरकतींवरील सुनावणीनंतर प्रारुप प्रभाग रचना अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर; 6 महिने निवडणूक लांबली तरी हीच प्रभाग रचना कायम राहणार – अधिकार्‍यांचा दावा

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आगामी निवडणुकीसाठी (PMC Elections) करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेचा (PMC Draft ward Structure) अहवाल आज राज्य निवडणुक आयोगाकडे (State Election Commission, Maharashtra) सादर करण्यात आला आहे. राज्य निवडणुक आयोगाने यापुर्वी सुचविल्याप्रमाणेच दुरूस्त प्रारुप प्रभाग रचनेवरच हरकती व सूचना (objection and suggestion on PMC Draft ward Structure) मागवून सुनावणी घेण्यात आल्याने प्रभाग रचनेमध्ये फारसे बदल होणार नाहीत. तसेच ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या तरी हीच प्रभाग रचना अंतिम राहणार असल्याचे सूतोवाच वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत. (PMC Draft ward Structure)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या १७३ जागांसाठी ५७ तीन सदस्यीय व एक द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांवर निवडणुक प्राधीकृत अधिकारी यशदाचे संचालक एस. चोक्कलिंगम (S Chockalingam) यांच्या नेतृत्वाखालील समितीने सुनावणी घेतली आहे. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सुनावणीवरील अहवाल २ मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची मुदत होती. मात्र, सुमारे ३५ हजार हरकती आल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे दौर्‍यामुळे (PM Modi Visit To Pune) विहीत मुदतीत अहवाल तयार करणे शक्य नसल्याचे कारण देत महापालिका आयुक्तांनी अहवाल सादर करण्यास दोन वेळा मुदतवाढ मागितली होती. ती मुदत आज संपली. ही मुदत संपण्याअगोदरच आज हरकती व सूचनांवरील सुनावणीसह अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (pmc additional commissioner ravindra binwade) यांनी याला दुजोरा दिला असून अधिक माहिती देण्यास नकार दिला. (PMC Draft ward Structure)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation Maharashtra) राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किमान सहा महिनेे लांबतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणुका लांबल्यास आता केलेल्या प्रभाग रचनेतही बदल होतील, अशी जोरदार चर्चा राजकिय वर्तुळात आहे.
मात्र, अधिकार्‍यांनी चर्चेतील या शंकेला छेद दिला आहे. महापालिकेने ६ डिसेंबरलाच प्रारुप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे दिली होती.
मात्र, प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमारेषांचे पालन झाले नसल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे आल्यानंतर आयोगानेही या रचनेत २४ बदल सुचविले होते.
महापालिका प्रशासनाने हे बदल केल्यानंतरच आयोगाने त्यावर हरकती व सूचना मागविण्याचे आदेश दिले.
यानंतरही ३५ हजार हरकती आल्या. यापैकी साधारण साडेसात हजारच हरकतदार प्रत्यक्ष सुनावणीच्यावेळी उपस्थित राहीले.
यामुळे सुनावणीनंतर दीड ते दोन टक्केच बदल केेल्याची चर्चा अधिकारी वर्तुळात आहे.
या सोबतच प्रारुप प्रभाग रचना, त्यावर हरकती सूचना मागवून सुनावणी घेउन अंतिम करण्यात येणार्‍या प्रभाग रचनेनुसारच आगामी निवडणुका होतील, असा दावा अधिकारी वर्गाकडून करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  PMC Draft ward Structure | Pune Municipal Election Draft ward composition report submitted to State Election Commission after hearing on objections Even if the election is delayed for 6 months the same ward structure will remain officials claim

हे देखील वाचा :

PORD vs SIP | 100 रुपये मंथली गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर कुठे होईल जास्त फायदा, पहा कॅलक्युलेशन

Income Tax Raid | मंत्री अनिल परब यांच्या CA च्या घरावर आयकर विभागाचा छापा

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद; जाणून घ्या ‘कोरोना’ची इतर आकडेवारी

Related Posts