IMPIMP

PMC Medical College | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी ! महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

यंदाच्याच वर्षी 100 प्रवेश करण्यास मान्यता ! एनएमसीकडून अंतिम मंजुरीचे पत्र महापालिकेस प्राप्त

by nagesh
PMC Medical College | Final approval for Pune Municipal Medical College Great success for the pursuit of Mayor Muralidhar Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमहापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (PMC Medical College) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून (NMC) प्राप्त झाली असून महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एनएमसीच्या National Medical Commission (NMC) मंजुरीनंतर यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसह स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असणारी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) म्हणून पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (PMC Medical College)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. (PMC Medical College)

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरीमिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे. आपल्या पाठपुराव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोलाची साथ मिळाल्याने अंतिम मंजूरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. त्याबद्दल तिघांचेही समस्त पुणेकरांच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद’.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

असा झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास…

२८ ऑगस्ट, २०१९ : मुख्यसभेत ठराव मंजूर
२६ मे, २०२० : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी
१३ ऑगस्ट, २०२० : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी
२८ नोव्हेंबर, २०२० : MUHS कडून Affiliations Consent प्राप्त
७ मार्च, २०२२ : अंतिम मंजुरी

Web Title :- PMC Medical College | Final approval for Pune Municipal Medical College Great success for the pursuit of Mayor Muralidhar Mohol

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमधील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कपडे व्यावसायिकाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न, एकावर FIR

Aurangabad Crime | पैठण – औरंगाबाद रोडवर महिलेचा खून, प्रचंड खळबळ

Related Posts