IMPIMP

PMC Medical College Pune | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ‘पीपीपी’ तत्वावर चालवणार ! महापालिकेवरील आर्थिक दायित्व कमी करण्यासाठी प्रस्ताव

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) वतीने सुरू करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) दरवर्षी 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय पीपीपी Purchasing Power Parity (PPP) तत्वावर चालविण्यात यावे, असा प्रस्ताव आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टच्या बैठकी मध्ये मांडला. यंदाच्या महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपत असताना शेवटच्या दिवशी आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडल्याने वैद्यकीय महाविद्यालय हा महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरणार ? या चर्चेला सुरवात झाली आहे. (PMC Medical College Pune)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या (PMC) वतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Trust Pune) सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून यंदाच्या वर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रत्यक्ष शिक्षण सुरू होणार आहे. महापालीकेने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे (Charity Commissioner Pune) नोंदणी करून ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय सुरू केले आहे. या ट्रस्टवर महापौरांसह (PMC Mayor) पालिकेतील पदाधिकारी आणि गटनेत्यांच्याही समावेश आहे. दरम्यान डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या जागेवर महाविद्यालयाची अद्ययावत इमारत उभारण्यासाठी 650 कोटी रुपये खर्च महापालिका करणार आहे. तसेच सध्या कमला नेहरू रुग्णालय (Kamla Nehru Hospital Pune), बाबुराव सणस कन्याशाळा (Baburao Sanas Kanya Shala Pune) येथे वर्गखोल्या तयार केल्या असून तेथेच शिक्षण व्यवस्था करण्यात आली आहे. (PMC Medical College Pune)

दरम्यान मागील आठवड्यात महाविद्यालयाला अंतिम परवानगी मिळल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची दोन वेळा बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांकडून फी किती आकारावी, व्यवस्थापन कसे असावे, महाविद्यालय चालविण्यासाठी दरवर्षी येणारा खर्च, यासाठी उत्पन्नाचे स्रोत काय असतील, महापालिकेचे दायित्व यावर विस्तृत चर्चा झाली. आज झालेल्या बैठकीमध्ये महाविद्यालय चालविण्यासाठी तसेच नवीन इमारत उभारण्यासाठी पालिकेला दरवर्षी 200 कोटी रुपये खर्च येणार आहे. ट्रस्ट असली तरी तो महापालिकेचा असल्याने देणगीतून फारसा निधी मिळणार नाही, असाही मतप्रवाह पुढे आला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी ट्रस्ट ने पीपीपी तत्वावर महाविद्यालय चालविण्यास देण्याचा पर्याय बैठकीत मांडला. महापालिकेवरील दायित्व कमी होईल, असा यामागील हेतू होता. परंतु हे करत असताना केंद्र सरकारच्या गाईड लाईन्सचा अभ्यास करून मगच निर्णय घेणे योग्य होईल असेही या बैठकीत चर्चा झाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले,
महाविद्यालय ट्रस्टच्या माध्यमातून पीपीपी तत्वावर चालविण्याबाबतचा मुद्दा आपणच उपस्थित केला.
महाविद्यालय चालविण्याचा खर्च आणि फी व अन्य मार्गातून मिळणारे उत्पन्न याची तोंडमिळवणी करताना महापालिकेवर आर्थिक (PMC Budget) बोजा पडणार आहे.
पुढे जाऊन हा खर्च वाढल्यास वेळोवेळी महापालिकेला निधी देण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.
त्यामुळे आज बैठकीत महाविद्यालय पीपीपी तत्वावर चालविण्याचा मुद्दा उपस्थित केला.

Web Title :- PMC Medical College Pune | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College to be run on Purchasing Power Parity (PPP) basis Proposal to reduce financial liability on Pune Municipal Corporation (PMC)

हे देखील वाचा :

Dilip Walse Patil | ‘देवेंद्र फडणवीसांना आरोपी म्हणून नाहीतर…. ‘; गृहमंत्र्यांनीच सांगितलं नोटीस पाठवण्याचं खरं कारण !

Kiara Advani-Siddharth Malhotra News | पुरस्कार सोहळ्यात ‘या’ अभिनेत्रीचा ड्रेस संभाळत बसला सिद्धार्थ मल्होत्रा, बिचाऱ्या कियाराला काढावा लागला एकटीला फोटो

Post Office Savings Schemes | PPF सह Post Office च्या ‘या’ 10 बचत योजनांवर मिळते मोठे व्याज, जाणून घ्या सर्व माहिती 1 मिनिटात

Related Posts