IMPIMP

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत करात यंदा वाढ नाही

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन PMC Property Tax | पुणेकरांच्या मिळकत करामध्ये आगामी २०२२-२३ या आर्थिक वर्षात कुठलिही करवाढ करण्यात येणार नाही. महापालिकेमध्ये (Pune Corporation) सत्तेत आल्यानंतर भाजपने एकदाही करवाढ न करता अन्य मार्गाने महापालिकेचे उत्पन्न प्रथमच पाच हजार कोटी रुपयांच्या पुढे नेले आहे, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. (PMC Property Tax)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मिळकतकर आकारणी व संकलन विभागाने आगामी आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण करासह अन्य करांमध्ये दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासंदर्भात बोलताना स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (PMC Standing Committee Chairman Hemant Rasne) यांनी सांगितले, की आगामी आर्थिक वर्षात प्रशासनाने सुचविलेली करवाढ फेटाळण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. मागील पाच वर्षात मिळकतकर थकबाकी वसुल करण्यासह अन्य मार्गाने उत्पन्न वाढीसाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. जानेवारी अखेर ५ हजार ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. पुढील दोन महिन्यांत आणखी ७०० कोटी रुपये उत्पन्न गोळा होईल. मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेमध्ये आताच पालिकेने ७०० कोटी रुपये अधिकचे उत्पन्न मिळविले आहे. महापालिकेने प्रथमच पाच हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (PMC Property Tax)

राज्यातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने २०१८ मध्ये नागरिकांना मिळकत करातील सर्वसाधारण करामध्ये ४० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. ही सूट बेकायदा असून २०११ पासून संबधित नागरिकांकडून थकबाकी वसुलीचे आदेश दिले आहेत. मागील तीन वर्षात महापालिकेने या थकबाकीदारांना नोटीस पाठवून थकबाकी वसुल करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने आकारणी करण्यात येणार्‍या मिळकतींना २०१८ पासून सूट देणे बंद केले आहे. पुणे शहरात दरवर्षी साधारण २० ते २५ हजार नवीन मिळकतींची आकारणी होते. तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षात सत्ताधार्‍यांनी थकबाकीदार कर दात्यांसाठी अभय योजना (Abhay Yojana Pune) राबविल्याने ५०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसुल झाली आहे. याचा लाभही महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- PMC Property Tax | There is no increase in Property tax of Pune Municipal Corporation this year

हे देखील वाचा :

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

Sangli Crime | सांगलीत महिला पोलीसाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

7th Pay Commission | खुशखबर ! PMPML च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

Related Posts