IMPIMP

PMJJBY | अवघ्या 330 रूपयाच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाखाचा विमा, तुम्ही घेतला का मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PMJJBY | 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका अशा विमा योजनेची सुरुवात केली होती, ज्यामध्ये वर्षात केवळ 330 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. PMJJBY योजनेचे नाव आहे – पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आहे. या योजनेची वैशिष्ट्य आणि तिचा लाभ कसा घेता येऊ शकतो, ते सविस्तर जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

1. कोण घेऊ शकतात लाभ

अवघे 330 रुपये वार्षीक प्रीमियम देऊन एनरोल होता येते. 2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळेल. यामध्ये 18 ते 50 वर्षापर्यंतच्या प्रौढांना सहभागी होता येते.

2. काय आहेत वैशिष्ट्ये

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अशा विमा योजनेची (PMJJBY) सुरुवात केली होती. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही.

3. वार्षिक प्रीमियम ऑटो-डेबिट केला जाईल

कुणीही ग्राहक केवळ एक बँक अकाऊंट आणि एका इन्श्युरन्स कंपनीसोबतच या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो. या योजनेत वार्षिक प्रीमियम केवळ 330 रुपये आहे जो दरवर्षी मे महिन्यात ग्राहकाच्या बचत खात्यातून ऑटो-डेबिट (Auto Debit) केला जातो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

4. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास पहिल्या दिवसापासून विमा कव्हर

PMJJBY विमा योजनेत एन्रॉल केल्याच्या 45 दिवसांच्या आत विमाधारकाचा सामान्य मृत्यू झाल्यास कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळत नाही, त्यानंतर मिळेल. परंतु दुर्घटनेत मृत्यू झाला तर विमा कव्हरचा लाभ तात्काळ मिळेल, हे कव्हर पहिल्या दिवसापासून असेल.

5. एक टर्म इन्श्युरन्स प्लान

पंतप्रधान जीवन विमा योजना मोदी सरकारचा (Modi Government) एक टर्म इन्श्युरन्स प्लान आहे. टर्म प्लानचा अर्थ हा असतो की विमा पॉलिसी दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी इन्श्युरन्सच्या रक्कमेचे पेमेंट करते. पॉलिसीधारक जीवन ज्योती विमा योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ठिक-ठाक राहिला तर त्यास कोणताही लाभ मिळत नाही.

6. सर्व उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी

या योजनेत EWS आणि BPL सह जवळपास सर्व उत्पन्न गटातील लोकांसाठी प्रीमियमचा परवडणारा दर उपलब्ध आहे.
योजनेत विमा कव्हर त्याच वर्षाच्या 1 जूनपासून सुरू होईल आणि पुढील वर्षी 31 मेपर्यंत असेल.
हा विमा खरेदी करण्यासाठी मेडिकल तपासणीची गरज नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

7. दरवर्षी रिन्यू करा

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत (PMJJBY) टर्म प्लान दरवर्षी रिन्यू करावा लागतो.
म्हणजे एकदा प्रीमियम भरल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीतच लाभ मिळेल.

8. कमाल लाभ 2 लाख रुपयांचा मिळेल

विमा कव्हर कलावधी दरम्यान जर सदस्यांचा मृत्यू झाला तर 2 लाख रुपयांची रक्कम त्याच्या कुटुंबियांना (नॉमिनी) प्राप्त होईल.
अनेक बँकांमध्ये या सकीममध्ये एन्रॉलमेंट करणे किंवा अनेक ठिकाणी प्रीमियम जमा करण्याचा कोणताही फायदा नाही,
कारण तुम्ही स्कीममध्ये कितीही प्रीमियम जमा केला तरी विमा कव्हरचा लाभ कमाल 2 लाख रुपयेच मिळेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- PMJJBY | modi government scheme insurance rs 2 lakh annual premium pm jeevan jyoti bima yojana PMJJBY Marathi News

हे देखील वाचा :

Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय

Maharashtra Rains | ‘महाराष्ट्रात आगामी दोन दिवस पावसाची शक्यता’ – IMD

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Related Posts