IMPIMP

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

by nagesh
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनसिंहगडावर (Sinhagad Fort) पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे तेथील वाहतूक कोंडी (Traffic Jams) कमी
व्हावी यासाठी तसेच प्रदूषण (Pollution) होऊ नये म्हणून पीएमपीएमएल’ची ई-बस (PMPML E-Bus) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वनविभागाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2 मे पासून ई-बसची (PMPML E-Bus) सुविधा सुरु करण्यात आली. मात्र, या बसला गडावर जाताना
आणि येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या सर्व गोष्टींचा फटका पर्यटकांना (Tourists) बसत आहे. या
पार्श्वभूमीवर सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीकरीता स्थगित (Postponed) करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिंहगडावर होणारी गर्दी आणि सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी 1 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते सिंहगड किल्ल्यासाठी ई-बस (PMPML E-Bus) सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. 2 मे पासून प्रायोगिक तत्वावर सिंहगडावर खाजगी वाहने बंद करुन ई-बस सेवा सुरु करण्यात आली. यासाठी सिंहगड वाहनतळावर चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्यात आले होते. या बस सेवेला पर्यटकांचा चांगाल प्रतिसाद मिळाला. मात्र प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता उपलब्ध असलेल्या ई-बसेसची संख्या अपुरी पडत आहेत.

सिंहगडावर सुरु करण्यात आलेली ई-बस सेवेच्या मार्गामध्ये अरुंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण, चढता घाट, तीव्र उतार यामध्ये बसेसचे चार्जिंग मोठ्या प्रमाणात खर्ची पडत आहे. त्यामुळे बसेसची संख्या व चार्जिंग पॉईंटची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याची डागडुजी व काही ठिकाणी रुंदीकरण करणे आवश्यक आहे. ई-बस सुविधा सुरु झाल्यापासून किरकोळ अपघात व इतर अडथळ्यांचा विचार करुन या मार्गावर लहान ई-बसची आवश्यकता आहे. तसेच रस्त्याची दुरुस्ती होणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरील ई-बस सुविधा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही सुविधा नवीन बसची आवश्यक संख्येत उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात येईल असे पुणे महानगर परिवहन महामंडळाने सांगितले आहे.

Web Title : PMPML E-Bus | PMPML’s e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

हे देखील वाचा :

Betel Benefits For Male | ‘हे’ पान खाल्ल्यानं होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

Bhangire Pramod alias Nana Vasant | महंमदवाडी येथे हॉस्पीटलचे आरक्षण बदलून उद्यान उभारावे ! प्रभागातील उर्वरीत कामे पुर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा; माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Ketaki Chitale | केतकीच्या ‘त्या’ वादग्रस्त पोस्ट बाबत पोलीस तपासात मोठी माहिती आली समोर, ती पोस्ट…

Related Posts