IMPIMP

PMPML | लवकरच पुण्याच्या रस्त्यावर धावणार पीएमपीच्या वातानुकूलित कॅब

by nagesh
PMPML | PMPML's air-conditioned cab to run on Pune roads soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMPML | भरगच्च गर्दी आणि खडखड आवाज करणारी पीएमपीची बस, हे पुणेकरांना काही नवीन नाही. मात्र बदलत्या काळानुसार पीएमपी (PMPML) देखील रूप पालटत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक बसचा समावेश केल्यानंतर, आता ओला उबेरप्रमाणे पीएमपी देखील वातानुकूलित कॅब सेवा सुरू करणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

येत्या सहा महिन्यात पीएमपीएमएलची (PMPML) कॅब सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव
ठेवला जाणार असून मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सुरुवातीला शंभर कॅब या स्वतःच्या मालकीच्या तर आणखीन शंभर भाडे तत्वावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचे भाडे हे रिक्षापेक्षाही कमी
म्हणजे 10 रुपये प्रति किलोमीटर ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे यासर्व ई कॅब असल्याने प्रदूषण देखील टळणार आहे. 100 कॅबसाठी जवळपास 12
कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.

पीएमपीएमएलच्या सह संचालक चेतना केरूर (Chetana Kerur, Co-Director, PMPML) ‘सरकारसत्ता’शी बोलताना म्हणाल्या की, खासगी कॅबप्रमाणे पीएमपीकडून देखील कॅब सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या या योजनेवर नागरिकांचे अभिप्राय मागवण्यात आले आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकृत निर्णय घेईला जाईल.

Web Title : PMPML | PMPML’s air-conditioned cab to run on Pune roads soon

हे देखील वाचा :

Amitabh Bachchan | सासऱ्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ‘पॅरिस’हुन परतल्या सुनबाई

Aryan Khan Drug Case | शाहरूख खानचा मुलगा आर्यनमुळं माजी मुख्यमंत्री अडचणीत, पोलिसांकडे तक्रार

Mumbai Cruise Drug Case | NCP नेते नवाब मलिकांच्या आरोपावर NCB ने दिले उत्तर, म्हणाले – ‘आम्ही ‘या’ कारणामुळं 3 नव्हे 6 लोकांना सोडले होते’

शेतकरी बनण्याचं होतं स्वप्न पण बनला अ‍ॅक्टर, तुम्ही या सुपरमॉडलला ओळखलं का?

WhatsApp Loan | व्हॉट्सअपवर 10 मिनिटात मिळेल 10 लाख रुपयांचे बिझनेस लोन, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रोसेस

Related Posts