IMPIMP

PMPML चा तोटा 700 कोटी रुपयांवर पोहोचणार ! ‘आर्थिक’ उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांचा विचार सुरू

दिवसभर 10 रुपयांत प्रवासाच्या ‘पुण्यदशम’ सेवेचा आढावा घेणार - विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका

by nagesh
PMPML's loss to reach Rs 700 crore Various schemes are being considered to increase 'financial' income - Vikram Kumar, Commissioner, Pune Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) अर्थात पीएमपीएमएलचा (PMPML) तोटा वाढत असून यावर्षाअखेरीस हा 700 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढ, दुरूस्ती आणि पगारावरील खर्चात मोठ्याप्रमाणावर वाढ होत असून कोरोनानंतर प्रवासी संख्या रोडावल्याने त्यात भर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपीएमएलच्या सर्व सेवांचा आढावा घेण्यात येत असून कामगार व्यवस्थापन तसेच पीएमपीएमएलच्या मिळकतींचे व्यावसायीक वापरासाठी नियोजन करून उत्पन्न वाढविण्याच्या प्रस्तावांचाही विचार करण्यात येत आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या आगामी बैठकीमध्ये याअनुषंगाने प्रस्ताव मांडण्यात येतील अशी माहिती महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा (pmpml md laxminarayan mishra), स्मार्ट सिटीचे सीईओ संजय कोलते (Smart City CEO Sanjay Kolte) यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यासंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की पीएमपीएमएलचा तोटा वाढत आहे. साधारण दीड वर्षांपुर्वी 450 कोटी रुपयांवर असलेला तोटा 700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. डिझेल आणि सीएनजी गॅस दरामध्ये होत असलेली वाढ, पीएमपीएमएल (PMPML) कर्मचार्‍यांचे वेतन, बसेसची देखभाल दुरूस्ती आदीवर मोठ्याप्रमाणात खर्च होत आहे. पीएमपीएमएलचे दररोजचे उत्पन्न एक कोटी रुपयांच्या आसपास असून खर्चाच्या तुलनेत हे कमी आहे.

जगाच्या पाठीवर सार्वजनिक वाहतूक ही फायद्यात नाही. परंतू तोट्याचे प्रमाणही आटोक्यात असावे यादृष्टीने पीएमपीएमएलचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचे शहराच्या विविध भागात असलेल्या डेपोंचा व्यावसायीक विकास करून त्यातून भाड्याद्वारे उत्पन्न वाढविण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पीएमपीएमएलकडे अतिरिक्त असलेल्या कर्मचार्‍यांना महापालिकेच्या सेवेत वर्ग करून घेणे. तसेच आयटी सारख्या मोठ्या संस्थांना बसेस भाडेतत्वावर देउन खाजगी वाहनांची संख्या कशी कमी करता येईल, यावरही चर्चा झाली. हे सर्व विषय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

चौकट

१० रुपयांतील ‘पुण्यदशम’चा आढावा घेणार
पुणे महापालिका (Pune Corporation) आणि पीएमपीएमएलच्या (PMPML)
संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती शहरामध्ये दहा रुपयांत दिवसभर प्रवासासाठीची ‘पुण्यदशम’ ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
यासाठी 50 वातानुलीत मिनी बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत.
तीन महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आलेल्या सेवेचा आढावा घेण्याचे आदेश पीएमपीएमएल प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या बसेसच्या मार्गावरील पुर्वीची प्रवासी संख्या व सध्याची प्रवासीसंख्या, बस संचलनासाठी होणारा खर्च आदीचा बारकाईने अभ्यास करण्यास सांगितले आहे.
या आढाव्यानंतर ‘पुण्यदशम’ सेवेबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- PMPML’s loss to reach Rs 700 crore Various schemes are being considered to increase ‘financial’ income – Vikram Kumar, Commissioner, Pune Municipal Corporation

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

Kolhapur Crime | दुर्दैवी ! दांडीया पाहून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

Related Posts