IMPIMP

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अखेर मोकळा, UK च्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी; भारतातील CBI च्या अधिकार्‍यांची माहिती

by Team Deccan Express
pnb scam clear way nirav modis extradition approved uk home office

सरकारसत्ता ऑनलाइन – पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 11 हजार 400 कोटीला चूना लावून पळून गेलेला मुख्य आरोपी आणि फरारी घोषित केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी nirav modi याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. युकेच्या गृहमंत्र्यांनी मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली असून त्याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाणार आहे.

याबाबत सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, मोदीला nirav modi भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारीला निर्णय दिला होता. या निर्णयानंतर त्याला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी त्याला भारताकडे सुपूर्द करण्याला मंजुरी दिल्याची माहिती CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पण खटल्यात मोदींच्या हाती अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. आरोपात तथ्य असल्यामुळेच त्याला भारतातील न्यायालयाचे दार ठोठावे लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. खटल्याचा निकाल सुनावण्यात आला, तेंव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नीरव माेदी उपस्थित होता. मोदी याच्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील 12 क्रमांकाची बराक ही योग्य जागा आहे, तिथे त्याच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि आत्महत्या करण्यास तिथे वावही नसेल, असेही न्यायालयाने म्हटले होते.

Also Read :

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts