IMPIMP

PO Monthly Income Scheme | दर महिना 2500 रुपये मिळवण्यासाठी एक रक्कमी किती जमा करावे लागतील; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Money Making Tips | top 5 savings schemes with govt guarantee know which one will give more security and return on your savings

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PO Monthly Income Scheme | वाढत्या आर्थिक असुरक्षेमुळे लोकांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जी सुरक्षित सुद्धा असेल आणि रिटर्न सुद्धा चांगला मिळत असेल. जर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम (PO Monthly Income Scheme) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यामध्ये गुंतवणुकीवर धोका सुद्धा कमी आहे आणि रिटर्न सुद्धा चांगला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. या स्कीमद्वारे पैसे पूर्ण गॅरंटीसह परत मिळवू शकता ते सुद्धा व्याजासह

दरमहिना मिळतील पैसे

सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. 5 वर्षानंतर गॅरेंटेड इन्कम होऊ लागेल. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. जर महिन्याचा इन्कम पाहिजे असेल तर 2475 रुपये दरमहिना कमाई होईल.

केवळ 1000 रुपयात उघडता येईल खाते

ही योजना पाच वर्षाच्या लॉकइन कालावधीसह येते. किमान 1000 पासून गुंतवणूक करता येते.
यामध्ये जॉईंट अकाऊंट उघडण्याची सुविधा मिळते. ज्यामध्ये सिंगल आणि जॉईंट (3 व्यक्तींपर्यंत) दोन्ही अकाऊंट उघडता येऊ शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

काय आहेत योजनेच्या अटी

जर खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या अगोदर खाते बंद केले तर मूळ रक्कमेतून 2 टक्केच्या बरोबरीची कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. जर खाते उघडण्याच्या तारखेच्या 3 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केले तर मुळ रक्कमेतून 1 टक्के कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर तुम्हाला योजनेचे सर्व फायदे मिळतील. (PO Monthly Income Scheme)

Web Title :- PO Monthly Income Scheme | post office monthly income scheme how much one lump sum will have to be deposited to get regular 2500 rupees every month

हे देखील वाचा :

Nawab Malik | नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

Monalisa Viral Video | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने लोकांसमोर मारली पतीच्या कानशिलात, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

Related Posts