IMPIMP

भाजपच्या चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर पोलिसांची ‘धाड’ !

by bali123
ashok-navale committed-suicide-he lodged a complaint against chitra wagh suporter in pandharpur

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी केली होती. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरही चित्रा वाघ आक्रमक दिसत आहेत. त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधणारे ट्विट केले. त्यानंतर आता चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडुरंग अधटराव ( vidul pandurang adhatrao ) यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली.

विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस आणि सहायक निबंधक यांनी धाड टाकली आहे. तसेच आता त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 48 चेक, 9 हिशोब वह्या, कोरा स्टँप, चेकबुक, बँक पासबुक यांसह 29,340 रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याविरोधात सावकारकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. आता पोलिसांकडून अधटराव यांच्या इतर काही साथीदारांचा शोध घेतला जात आहे. अधटराव यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 135/2021 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39, 45 सह भा.दं.वि. कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय
विदूल अधटराव हे भाजप युवा मोर्चाचे पंढरपूर शहराध्यक्ष आहेत. तसेच ते चित्रा वाघ यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Related Posts