IMPIMP

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम तुम्हाला देईल दरमहा पैसे, इतक्या वर्षात होईल 1.50 लाखाचा फायदा

by nagesh
Post Office | if you have invested in the post office then settle this work before april 1 otherwise you not get interest

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. यामध्ये अशा अनेक योजना येतात, ज्या चांगला नफा देतात. यापैकीच एक योजना मासिक उत्पन्न आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करणे जोखीममुक्त मानले जाते. (Post Office Monthly Income Scheme)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

यामध्ये 1,000 रुपयांची किमान गुंतवणूक केली जाते. मध्यम आणि कमी उत्पन्न गटाचे गुंतवणुकदार या पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेला कर-बचतीचा पर्याय म्हणून पाहू शकतात. कारण योजनेत गुंतवणुकीवर प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा दावा सुद्धा करता येतो.

काय आहे पोस्टाची मासिक उत्पन्न योजना
ही योजना पाच वर्षाच्या लॉकइन कालावधीसह येते. किमान 1000 पासून 4.50 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. तुमचे संयुक्त खाते असेल तर यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. योजनेत 6.60 टक्केने वार्षिक व्याज मिळते.

योजना तुम्हाला गुंतवणुकीदरम्यान किंवा नंतर, जेव्हा हवे तेव्हा, दर महिना पैसे देते. व्याज उघडण्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यानंतर आणि अशाप्रकारे मॅच्युरिटीपर्यंत देत असेल आणि गुंतवणुकदाराला यासाठी दावा करावा लागेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गॅरेंटेड रिटर्न योजना
ही पोस्टाची जोखिम मुक्त गॅरेंटेड रिटर्न योजना आहे. जर कुणी गुंतवणुकदाराने आज पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केली तर त्यास मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणुकीवर 6.60 टक्के रिटर्न मिळेल.

जर खातेधारकाचा मॅच्युरिटी कालावधीपूर्वीच मृत्यू झाला तर खाते बंद करता येऊ शकते.
आणि रक्कम नॉमिनी /कायदेशीर वारसांना परत केली जाईल. मागील महिन्यापर्यंत व्याजाचे पेमेंट केले जाईल, ज्यामध्ये रिफंड केले जाईल.

कोण उघडू शकतात खाते
केवळ भारतीय रहिवाशीच मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतात.
आपल्या जवळच्या पोस्टात आवश्यक कागदपत्रे जमा करून कुणीही प्रौढ व्यक्ती पोस्टात एमआयएस खाते उघडू शकतो.

10 वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन आपल्या नावाने हे खाते उघडू शकतात,
परंतु कागदपत्रे म्हणून त्यास आपल्या पालकांची कागदपत्रे सुद्धा द्यावी लागतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

कसे आणि केव्हा मिळतील 1.50 लाख रुपये
समजा तुम्ही पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत कमाल 4.50 लाखाची गुंतवणुक केली आहे.
ज्यावर तुम्हाला 6.60 टक्के व्याजदर दिला जात आहे तर महिना तुम्हाला 2,475 रुपये मिळतील,
ज्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1,48,500 रुपयांचा फायदा होईल. (Post Office Monthly Income Scheme)

Web Title :- Post Office Monthly Income Scheme | post office monthly income scheme will give you money every month there will be a benefit of 1 lakh 50 thousand in so many years

हे देखील वाचा :

BSNL Prepaid Plan | बीएसएनएलने वाढवली 60 दिवसांसाठी ‘या’ प्लानची वैधता; जाणून घ्या प्लान

Monalisa Bold Dance | मिनी स्कर्ट परिधान करुन मोनालिसाचा पुन्हा एकदा जलवा, शेअर केला व्हिडीओ

Pune News | ‘तालचक्र’ महोत्सवाच्या 9 व्या पर्वाचे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आयोजन; भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव

Related Posts