IMPIMP

Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना ! फक्त 417 रुपये गुंतवा अन् बना करोडपती

by nagesh
PPF Investment | invest money in ppf get higher returns than bank and post office

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Post Office PPF Scheme | पोस्ट ऑफिस (Post Office) आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणत असते. गुंतवणुकीसाठी व्यक्तीला अधिक सुरक्षित असा मार्ग म्हणजे पोस्ट ऑफिस आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांचा कल पोस्ट ऑफिसकडे असतो. दरम्यान, पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना (Post Office PPF Scheme) तुम्हाला करोडपती होण्याची एक संधी उपलब्ध करुन देत आहे. यामुळे व्यक्तीला दररोज केवळ 417 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी पंधरा वर्षांचा असला, तरी तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवू शकणार आहात. याबाबत सविस्तर माहिती पाहणे महत्वाचे आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या योजनेमध्ये व्यक्तीला कर लाभदेखील मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेत व्यक्तीला वार्षिक 7.1 टक्के व्याज आणि त्यामुळे तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळणार आहे. (Post Office PPF Scheme)

PPF खात्याचे तपशील –

समजा एखाद्या व्यक्तीने 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूक केली आणि अधिकाधिक 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, म्हणजे एका महिन्यात 12,500 रुपये आणि एका दिवसात 417 रुपये, तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख होईल. परिपक्वतेच्या वेळी, व्यक्तीला 7.1 टक्के वार्षिक व्याजासह चक्रवाढीचा लाभही मिळणार आहे. यात मॅच्युरिटीच्या वेळी व्यक्तीला 18.18 लाख रुपये व्याज मिळतील. तर, एकूण रक्कम 40.68 लाख रुपये मिळतील.

असे व्हाल करोडपती?

या योजनेमधून करोडपती व्हायचे असल्यास तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुमची गुंतवणूक 15 वर्षांनंतर 5-5 वेळा दोनदा वाढवू शकता. वार्षिक 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंंतवणूक 37.50 लाख रुपये होणार आहे. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळतील. अर्थात 25 वर्षांनंतर तुमचा एकूण निधी 1.03 कोटी होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पीपीएफ अकाउंट कोण उघडू शकते?

 • केवळ 1 व्यक्ती हे अकाऊंट उघडू शकते.
 • यात तुम्ही संयुक्त अकाऊंट उघडू शकत नाही.
 • अल्पवयीन मुलांच्या वतीने पालक/पालक पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन पीपीएफ अकाउंट उघडू शकतात.
 • अनिवासी भारतीयांना त्यात अकाउंट उघडता येत नाही. जर रहिवासी भारतीय पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटी पूर्वी एनआरआय झाला तर तो मॅच्युरिटी होईपर्यंत अकाऊंट चालू ठेवू शकतो.
 • विशेष म्हणजे पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये अकाऊंट उघडू शकतो.

कागदपत्रे काय ?

 • ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, Aadhaar card
 • पत्ता पुरावा – मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, नाव नोंदणी फॉर्म- फॉर्म ई

वैशिष्ट्ये पाहा –

 • एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे.
 • पोस्ट ऑफिस पीपीएफमध्ये ठेवींची संख्या वार्षिक 12 पर्यंत मर्यादित आहे.
 • पीपीएफ ही EEE (E-E-E) गुंतवणूक आहे म्हणजेच गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या सर्व करमुक्त आहेत.
 • खाते सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक असलेली किमान वार्षिक गुंतवणूक 500 रुपये आहे.
 • पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यावरील (Post Office PPF Scheme) व्याज दरवर्षी चक्रवाढ होते आणि दरवर्षी 31 मार्च रोजी दिले जाते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Post Office PPF Scheme | the post office is giving a great opportunity in this scheme you can become a millionaire by simply depositing rs 417 PPF Scheme

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5480 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Inflation Price Hike | नवीन वर्षात खिशाला कात्री लागण्याची तयारी, साबणापासून SUV पर्यंतच्या किमती वाढणार !

कोविड-19 मधून बरे झालेल्यांना Life Insurance Policy साठी खूप प्रतीक्षा करावी लागेल ! पाहावी लागेल 6 महिन्यांपर्यंत वाट

Related Posts