IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला देईल 16 लाख रुपयांचा फायदा, तुम्हाला केवळ 10,000 रुपयांची करावी लागेल बचत

by nagesh
Post Office MIS | post office monthly income scheme husband and wife can open an account together

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office मध्ये गुंतवणुक करणे सुरक्षित मानले जाते. यामध्ये अनेक अशा बचत योजना (Post Office Scheme) आहेत ज्या चांगला रिटर्न देतात. अशीच एक पोस्ट आवर्ती जमा (Post Office Recurring Deposit – RD) योजना आहे. या योजनेत 100 रुपयांपासून सुद्धा खाते उघडता येते, जे तुम्हाला चांगला रिटर्न देते. मात्र या योजनेत (Post Office Scheme) व्याजदर वेळोवेळी सुधारित करण्यात येतो. 5 वर्षांचे पोस्ट आवर्ती जमा खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस आरडीवर सध्या 5.8% प्रति वर्ष व्याज देत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोस्ट ऑफिस आवर्ती जमा
पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट ओपन होते ते 5 वर्षासाठी असते. यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा
रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते. नंतर ते दर तिमाहीच्या अखेरीस तुमच्या अकाऊंटमध्ये चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडले जाते.

बंद पडलेली आरडी जमा
जर तुम्ही वेळेवर आरडीचा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्याला उशीर झाल्यास दरमहिना एक टक्क दंड भरावा लागेल.
सोबतच जर तुम्ही लागोपाठ 4 हप्ते भरले नाही तर अकाऊंट बंद होईल.
मात्र अकाऊंट बंद झाल्यास ते पुढील 2 महिन्यासाठी पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट करता येऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

10,000 रुपयांची सेव्हिंग
जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील. (Post Office Scheme)

Web Title :- Post Office Scheme | this scheme of post office will give you the benefit of rs 16 lakh you just have to save rs 10000

हे देखील वाचा :

Sonam Kapoor | सोनमच्या ब्रालेटमधील ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे नेटकरी संतप्त

महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनची पद्धत बदलणार, Labor Ministry ने दिले नवीन ‘बेस ईयर’

ST Workers Strike | आम्ही उद्यापर्यंत वाट बघू, अन्यथा आंदोलक कर्मचाऱ्यांना कडक कारवाईला सामोरे जावं लागेल; अनिल परब यांचा इशारा

Related Posts