IMPIMP

फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिस देतंय पैसे दुप्पट करण्याची सुवर्णसंधी, आजच करा 1000 रूपयांची गुंतवणूक अन् मिळवा लाखोंचा लाभ

by nagesh
post office small saving schemes kisan vikas patra kvp minimum 1000 rs invest give double return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्व्हेस्टमेंट करणे एक चांगली सवय आहे. कारण वाईट काळात हिच बचत उपयोगी येते. प्रत्येक व्यक्ती हाच शोध घेत असतो की, सुरक्षित आणि जास्त रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणूक कुठे करायची. आज आम्ही एका अशा स्कीमबाबत सांगणार आहोत जिथे पैसे सुरक्षित राहतील तसेच मॅच्युरिटीवर डबल रिटर्न मिळेल. ही पोस्ट ऑफिसची (Post Office) किसान विकास पत्र योजना आहे. याबाबत सर्वकाही जाणून घेवूयात…

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

किसान विकास पत्र भारत सरकारची वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. येथे ठराविक कालावधीत पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये Post Office आणि मोठ्या बँकेत उपलब्ध आहेत. केव्हीपी भारत सरकारद्वारे जारी एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे, जेथे ठरलेल्या कालावधीत तुमचे पैसे दुप्पट होतात. याचा मॅच्युरिटी पीरियड सध्या 124 महीने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयांची करता येते. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

कोण करू शकतात गुंतवणूक
किसान विकास पत्रात गुंतवणूक करणार्‍याचे वय किमान 18 वर्षे असणे जरूरी आहे. यामध्ये सिंगल अकाऊंटशिवाय जॉईंट अकाऊंटसुद्धा काढू शकता. ही योजना अल्पवयीनांसाठी सुद्धा आहे. ज्याची देखरेख पालकांना करावी लागते. ही योजना हिंदू विभक्त कुटुंबांना वगळून ट्रस्टसाठी सुद्धा लागू आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या Post Office स्कीममध्ये वार्षिक 6.9 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुमचे पैसे 124 महिन्यात (10 वर्षे आणि 4 महिने) डबल होतील. उदाहरणार्थ तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत, तर 124 महिन्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील.

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

ट्रान्सफर करण्याची सुद्धा सुविधा
किसान विकास पत्र जारी करण्याच्या तारखेच्या अडीच वर्षानंतर पूर्तता केली जाऊ शकते. केव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा स्थलांतरित करता येते. किसान विकास पत्र एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला हस्तांतरीत करू शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी करण्यात येते.

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

असे उघडा खाते
यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय फॉर्म आनलाइन सुद्धा डाऊनलोड करता येतो. फॉर्मवर पूर्ण नाव, जन्म तारीख आणि व्यक्तीचा पत्ता लिहावा लागेल. फॉर्ममध्ये पर्चेस अमाऊंटची मात्रा स्पष्ट लिहावी. केव्हीपी फॉर्मची रक्कम रोख किंवा चेकने भरता येते. चेकने पैसे भरल्यास, फॉर्मवर चेकनंबरची माहिती लिहा.

Also Read :

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

पुण्यातील माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED करणार बारमालकांची चौकशी, 5 जणांना समन्स

Related Posts