IMPIMP

Postal Life Insurance | पोस्ट विभागाने लाँच केला नवीन डिजिटल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स बाँड, पेमेंट करणे होणार सोपे

by nagesh
Insurance Policy Tax | income tax benefit of one and half lakh can be claimed on these insurance policies

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Postal Life Insurance | पोस्ट विभागाने मंगळवारी पोस्ट जीवन विमा पॉलिसी-ईपीएलआय बाँडची डिजिटल आवृत्ती जारी केली आहे (Issued digital version of Post Life Insurance Policy-EPLI Bond). यानंतर आता डीजी लॉकरद्वारे अंशधारकांची पोहोच पॉलिसीपर्यंत (Postal Life Insurance) असेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोस्ट विभागाने माहिती दिली की, डीजी लॉकरच्या (digilocker) मदतीने ईपीएलआय बाँडने लोकांना दाव्यांचा लवकर निपटारा होऊ शकतो.
आता, सर्व जुने आणि नवीन पोस्ट जीवन विमा (Postal Life Insurance) ग्राहक डीजी लॉकरद्वारे आपल्या पॉलिसी बाँडची डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकतील.

सहज करू शकतील पेमेंट :

याबाबत पोस्ट विभागाने म्हटले आहे की, डीजी लॉकरमध्ये सुरक्षित प्रकारे लॉग-इन करून, पॉलिसी धारक आपल्या मोबाइल फोनवर पॉलिसी बाँडची
डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकतात.
पोस्ट जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण पोस्ट जीवन विमा (आरपीएलआय) पॉलिसी बाँड दोन्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहेत.
यामुळे पॉलिसी धारक मोबाइलद्वारे सहजपणे पेमेंट करू शकतील.
याचा विकास इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (Meity) मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय ई-संचालन प्रभागाने केला आहे.

पोस्ट विभागाने म्हटले की, जर धारकाकडे होल लाईफ अ‍ॅश्युरन्स, कन्व्हर्टेबल होल लाईफ अ‍ॅश्युरन्स, चाईल्ड पॉलिसी, युगल सुरक्षा (पीएलआयमध्ये) एंडोमेंट अश्युरन्स,
प्रत्यक्ष एंडोमेंट अ‍ॅश्युरन्स आणि ग्राम प्रिया सारख्या पोस्ट आणि ग्रामीण पोस्ट जीवन विमा पॉलिसी असतील तर पोस्ट विभागाकडून पॉलिसी बाँड जारी करण्याच्या ताबडतोब
नंतर ते डाऊनलोड करता येऊ शकतात.
डाक विभागाचे सचिव विनीत पांडेय (Postal Secretary Vineet Pandey) यांनी सांगितले की, ही डिजिटल कॉपी वैध मानली जाईल. पॉलिसीत बदलसुद्धा करता येतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Postal Life Insurance | now policy bond on digilocker postal life insurance subscriber easy settle maturity

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Cryptocurrency | काय सांगता ! होय, जगात सर्वात जास्त 10.07 कोटी क्रिप्टोकरन्सी यूजर्स भारतात – रिपोर्ट

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

Related Posts