IMPIMP

Pranav Dhanawade | जेव्हा शाळकरी मुलाने क्रिकेट विश्वात उडवली होती खळबळ, एका मॅचमध्ये बनवल्या १००० धावा

by nagesh
Pranav Dhanawade | When the schoolboy took the cricketing world by storm, scoring 1000 runs in a single match

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pranav Dhanawade | प्रणव धनावडे. हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. काही वर्षांपूर्वी या नावाने क्रिकेट
विश्वात (cricket world) खळबळ उडवून दिली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी एकाच सामन्यात १००० धावा करून प्रणव (Pranav Dhanawade)
याच दिवशी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कल्याणच्या केसी गांधी हायर सेकंडरी स्कलूमधील १५ वर्षीय धनावडे याने शालेय क्रिकेट सामन्यात हा पराक्रम केला. एमसीए (MCA) संलग्न भंडारी कप स्कूल क्रिकेट टुर्नामेंट (Bhandari Cup school cricket tournament) मध्ये त्याने आर्य गुरुकुल (Arya Gurukul) विरुद्ध नाबाद १००९ धावा केल्या.

प्रणवने केवळ ३२३ चेंडूंचा सामना करत ५९ षटकार आणि १२७ चौकार मारले. क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मेटमध्ये ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्या या खेळीनंतर तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) त्याला भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. (Pranav Dhanawade)

त्या भेटीबाबत बोलताना धनावडे म्हणाले, मी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चा मित्र आहे. माझ्या खेळीनंतर सचिन तेंडूलकरने घरी बोलावले होते. हे माझ्यासाठी स्वप्न एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. सचिन सरांनी मला बॅट भेट दिली आणि शुभेच्छाही दिल्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सामान्य कुटुंबातील असल्याने दुर्दैवाने धनावडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमवू शकला नाही. तो एअर इंडियासाठी कॉर्पोरेट स्पर्धा खेळायचा. यानंतर तो मुंबई सर्किटच्या बी डिव्हिजन क्लब व्हिक्टरी क्रिकेट क्लबकडून खेळू लागला. गेल्या वर्षी त्याला इंग्लंड नॉर्थविच क्रिकेट क्लब (England Northwich Cricket Club) कडून खेळण्याची संधी मिळाली आणि तो मँचेस्टर (Manchester) ला गेला.

Web Title : Pranav Dhanawade | When the schoolboy took the cricketing world by storm, scoring 1000 runs in a single match

हे देखील वाचा :

BBM4 | बिग बॉस मराठीला 4 मिळाले टॉप 5 स्पर्धक; मिड वीकला ‘हा’ खेळाडू …

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Devendra Fadnavis In Pune | डीईएस प्री-प्रायमरी स्कूल मुरलीधर लोहिया मातृमंदिर’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

Related Posts