IMPIMP

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा मुलगा कोरोना पाँझिटिव्ह

by sikandershaikh
pune corona | 216 new corona patients in pune city in last 24 hours find out other statistics

इस्लामपूर : राज्यात कोरोना रूग्णांची वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते मुंबईमध्ये होम क्वारंटाइन आहेत. जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत प्रतिक पाटील (pratik jayant patil) यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीत प्रतीक पाटील संपूर्ण मतदारसंघात सक्रिय असतात. विविध कार्यक्रमांने उपस्थित असतात. जयंत पाटील यांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आल्याने प्रतिक पाटील (pratik jayant patil) यांनीही आपली कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी मी विलगिकरणात आहे. काळजी नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.’
अशी पोस्ट सोशल मीडियात प्रतिक पाटील यांनी पोस्ट केली आहे. ते सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

सध्या राज्य मंत्रिमंडळातील अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील,
आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू या नेत्यांचा कोरोनाची लागण झाली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत.

अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे नुकतेच कोरोना मुक्त झाले असून ते घरूनच काम करत आहेत.
या सर्व मंत्र्यांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निडणूक होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
आगामी पावसाळी अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड केली जाऊ शकते, तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts