IMPIMP

Pravin Darekar On Pawar Family | ‘पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा’ – प्रविण दरेकर

by nagesh
Pravin Darekar On Pawar Family | pravin darekar speacks on pawar family supriya sule ajit pawar and rohit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pravin Darekar On Pawar Family | पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे विधान परिषदेचे
आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar On Pawar Family) यांनी पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत
(Sanjay Raut) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. ‘राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या मुख्यमंत्री होण्यासाठी पुजाअर्चा,
अभिषेक करत आहेत. आपले लाडके उपमुख्यमंत्रीही मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. रोहित पवारही (Rohit Pawar) मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं…

“रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं. नुकतीच त्यांची राजकारणात सुरुवात झालीय. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आता हयात नाही. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अजित पवार (Ajit Pawar) नेहमी सांगतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा त्यामुळे तुम्ही देखील तसं काही करु नये. तुम्ही तुमच्या घरातली काळजी घ्या,” असा सल्ला देखील प्रविण दरेकर (Pravin Darekar On Pawar Family) यांनी रोहित पवारांना दिला आहे.

संजय राऊतांवर टीका –

प्रविण दरेकर म्हणाले, “आमदारांना घोडेबाजारात उभं करणे हा आमदारांचा अपमान आहे. आमदार काही बाजारातली विकाऊ वस्तु नाही. 1 आमदार किमान 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. संजय राऊतांना आमदार विकाऊ वस्तू वाटत असेल तर तेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. आमदारांचा स्वाभिमान दुखावला तर संजय पवार निवडून यायचे आणि संजय राऊत यांना धोका मिळेल. त्यामुळे आता तोंड सांभांळून वागले तर त्यांच्या फायद्याचं राहिल,” असं देखील ते म्हणाले.

Web Title :- Pravin Darekar On Pawar Family | pravin darekar speacks on pawar family supriya sule ajit pawar and rohit pawar

हे देखील वाचा :

Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी आता हे करणे गरजेचे, जाणून घ्या संपूर्ण प्रकिया !

e-Aadhaar Card | विनाआधार क्रमांक सुद्धा डाऊनलोड करू शकता ई-आधार कार्ड, येथे पहा एक-एक स्टेप

Purchase Of Cotton Seeds | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापूस बियाणे विक्रीवरील बंदी उठवली; ठाकरे सरकारचा निर्णय

Related Posts