IMPIMP

President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

by nagesh
president-ram-nath-kovind-to-visit-raigad-president-ram-nath-kovind-to-visit-raigad-on-7-december-mp-sambhajiraje-bhosale-give-information-about-it

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  President Ram Nath Kovind To Visit Raigad | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला (Raigad) भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhajiraje Bhosale) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करुन राष्ट्रपती कोविंद हे येत्या ७ डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार आहेत. संभाजीराजे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. (President Ram Nath Kovind To Visit Raigad)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यात संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
त्यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि़ ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत.
ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

मराठा आरक्षणांसंबंधीचा प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली होती.
त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते़.

हे देखील वाचा :

Pune Crime | लष्करात असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्यचार

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts