IMPIMP

Priyanka Gandhi | प्रियांका गांधींना रोखण्यासाठी भाजपकडून ‘इराणी’ अस्त्र

by nagesh
Priyanka Gandhi | UP assembly election 2022 Congress Priyanka Gandhi BJP Smriti Irani PM Narendra Modi Anupriya Patel Amethi Marathi News

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (UP assembly election 2022) वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील गाठीभेटी घेण्यासाठी जोरदार सुरुवात केली आहे. वाढत्या महागाईमुळे महिलांची सहानुभूती काँग्रेसला मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) महिलांची मिळत असलेली साथ लक्षात घेत, भाजपनेही त्यांना रोखण्यासाठी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या (BJP) नेतृत्वाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना मैदानात उतरवले असून त्यांच्यावर मह्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

राज्यातील महिला मतदारांमध्ये पक्षाला बळकट करण्याची जबाबदारी इराणी यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘चाय पर चर्चा’च्या धर्तीवर ‘चना -चमेंने’वर स्मृती इराणी यांनी संवादाची मोहीम सुरु केली आहे. विशेष म्हणजे ही मोहीम अमेठीतून (Amethi) सुरु करण्यात आली आहे. महिलांचे छोटे छोटे गट बनवून सरकारने केलेल्या कामांची माहिती इराणी या महिलांना देणार आहेत. दरम्यान, प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) महिलांची साथ मिळत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भाजपवर नाराजी

२०१७ मधील निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केले होते.
मात्र सध्या वाढत्या महागाईने महिला मतदार भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे.
त्यांचा कल काँग्रेसकडे वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इराणी यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्याचबरोबर महिला मतदारांचा विश्वास कमावण्यासाठी मोदी सरकारमधील
मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत भाजप नेतृत्त्व असल्याचे समजते.

Web Title :- Priyanka Gandhi | UP assembly election 2022 Congress Priyanka Gandhi BJP Smriti Irani PM Narendra Modi Anupriya Patel Amethi Marathi News

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात CM, DGP यांच्याकडे तक्रार

LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता

Related Posts