IMPIMP

Professor N D Patil Passes Away | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

by nagesh
Professor N D Patil Passes Away | Professor N D Patil Passes Away At 93 in Kolhapur

कोल्हापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन – Professor N D Patil Passes Away | ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील (नारायण ज्ञानदेव पाटील) (Professor N D Patil Passes Away) यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या चळवळीतील एक लढवय्या नेता हरपला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील (Professor N D Patil Passes Away) यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणीही गेले नाही. सकाळीच उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. दरम्यान, अखेर त्याचं निधन झालं आहे.

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२, शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५, शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य – १९५९ पासून

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे. का. प.चे सरचिटणीस

१९७८-१९८० – सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य

१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )

रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य –
चेअरमन पद काळात :
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा,साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’  या योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक, दुर्बल शाखा विकास निधी, म. वि. रा. शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Web Title : Professor N D Patil Passes Away | Professor N D Patil Passes Away At 93 in Kolhapur

हे देखील वाचा :

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

Ibrahim Ashq | ‘कहोना प्यार है’, ‘क्रिश’, ‘वेलकम’ चित्रपटांचे गीतकार इब्राहिम आश्क यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Pune Weekend Lockdown | ‘पुण्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारी’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts