IMPIMP

Property Registration-Gunthewari | महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘मुहूर्त’, सोमवार पासून गुंठेवारीची नोंदणी सुरु

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Property Registration-Gunthewari | राज्य सरकारने (Maharashtra Government) गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा आदेश ऑक्टोबरमध्ये दिला होता. मात्र, पुणे महापालिकेकडून (Pune Corporation) या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. अखेर महापालिकेकडून गुंठेवारीतील (Gunthewari Pune) बांधकामे नियमित (Property Registration-Gunthewari) करण्याची प्रक्रिया येत्या सोमवार (दि.10) पासून करण्यात येणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन (Online Registration) पद्धतीने होणार असून, यासाठी नागरिकांनी आर्किटेक्टची (Architect) मदत घेऊन त्यांचा प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी पुढील तीन महिने मुदत असणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेमध्ये (PMC) सोमवारी (दि.3) गुंठेवारीतील बांधकामे नियमीत करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महापौर
मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी यासंदर्भात माहिती दिली. महापौर म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार, बांधकामे नियमित करण्यासाठी पद्धती निश्चित केली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांसह जुन्या हद्दीतील सर्व अर्ज ऑनलाईन स्विकारले जाणार आहेत. (Property Registration-Gunthewari)

तरच बांधकामे नियमित होतील

न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) विमानतळाच्या सीमा भिंतीपासून (Airport Boundary Wall) 100 आणि बॉम्ब डंपच्या (Bomb Dump) सीमा भिंतीपासून 900 मीटर क्षेत्रात झालेली बांधकामे आणि विमानतळाच्या फनेल झोनमध्ये (Airport Funnel Zone) असलेली बांधकामे नियमित करण्यासाठी संरक्षण खात्याचे (Defense Department) ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) आवश्यक आहे. ना हरकत प्रमाणपत्र असेल तरच ही बांधकामे नियमती केली जाणार आहेत. पुढील तीन महिने अर्ज स्विकारले जाणार असून यानंतर एकत्रित सर्व अर्जांची छाननी केली जाईल. त्यासाठी प्रतिगुंठा 1500 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एजंटच्या नादाला लागू नका- महापौर

गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करताना कोणत्याही एजंटच्या (Agent) नादाला लागू नका, आर्किटेक्टच्या मदतीने ऑनलाइन अर्ज करावेत, हे अर्ज स्विकारले जातील. आर्किटेक्टने एका अर्जासाठी 5 हजार रुपयांपेक्षा अधिकचे शुल्क आकारु नये, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Web Title : Property Registration Gunthewari | pune corporation property registration Gunthewari pune PMC Gunthewari

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

Related Posts