IMPIMP

PSI Nandkishor Patange Passed Away | दुर्दैवी ! पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांचे हृदयविकाराने निधन

by nagesh
PSI Nandkishor Patange Passed Away | Unfortunate! Police Sub-Inspector Nandkishore Patange passed away due to heart attack

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन–  PSI Nandkishor Patange Passed Away | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) बुधवारी (दि.21) निधन (PSI Nandkishor Patange Passed Away) झाले. ते 31 वर्षाचे होते. पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांना काही महिन्यांपूर्वी यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न (Control Room Attached) करण्यात आले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे यांना सोमवारी (दि.19)  सकाळी घरामध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले. नंदकिशोर पतंगे पीएसआय ट्रेनिंग पूर्ण करुन 2018 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Police Commissionerate) नियुक्त झाले होते.

पोलीस उपनिरीक्षक पतंगे हे 2010 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात नियुक्त झाले होते.
त्यानंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली होती.
2018 मध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) त्यांची नियुक्त करण्यात आली.
यानंतर त्यांची पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) बदली करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले होते.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पतंगे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Web Title :- PSI Nandkishor Patange Passed Away | Unfortunate! Police Sub-Inspector Nandkishore Patange passed away due to heart attack

हे देखील वाचा :

Delhi Police Action In Mumbai | दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर 1800 कोटींचे हेरॉईन जप्त

Ajit Pawar | शिंदे-फडणवीस 3 तासांनंतरही कार्यक्रमाला न आल्याने अजितदादा निघून गेले; आयोजकांना झापले, म्हणाले…

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Related Posts