पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap | ट्रस्टच्या जागेचा एन.ए. (अकृषक प्रमाणपत्र) प्रस्ताव मंजूर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयातून मंजूरी आणण्यासाठी तलाठयाने त्याच्यासाठी व वरिष्ठांसाठी तब्बल 42 लाख रूपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तलाठयास पुणे अॅन्टी करप्शनच्या विभागाने ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह तत्कालीन तहसीलदार आणि इतरांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)
शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार रंजना उमेश उमरहांडे, शिरूर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक स्वाती सुभाष शिंदे, तलाठी सरफराज तुराब देशमुख, खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅन्टी करप्शनच्या पथकाने तलाठी सरफराज देशमुख याला ताब्यात घेतलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एन.ए. प्रस्ताव मंजूर करावयाचा होता. त्यासाठी तलाठी देशमुखने त्यांच्याकडे 42 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. सदरील जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी 5 लाख रूपये तर स्वाती शिंदे यांनी 1 लाख रूपयाची मागणी केली. आरोपी घाडगे आणि निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Trap)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
तक्रारदाराकडून अॅन्टी करप्शनकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदरील तक्रारीची दि. 25 मे 2022 ते दि. 19 नोव्हेंबर 2022 दरम्यान पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वजण लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज (सोमवार) दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी पाचही जणांविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune ACB Trap | 42 lakh rupees bribe case! Pune anti-corruption action against 5 persons including Tehsildar Ranjana Umarhande, Revenue Assistant Swati Shinde, Talathi Sarfraz Deshmukh, know the case
Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा अडचणीत?, हायकोर्टात याचिका दाखल
Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती