IMPIMP

Pune ACB Trap | दोन लाखाची लाच मागणाऱ्या पुण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर अँन्टी करप्शनकडून FIR

by nagesh
ACB Demand Case | Anti-Corruption News: ACB files case against Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar in bribery case of 25 thousand

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – जागा, प्लॉटच्या वादासंदर्भात पत्नीने आणि सासऱ्याने केलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये
लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल
केला आहे. स्वराज आनंद पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुणे एसीबीकडून (Pune ACB Trap)
कोंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 34 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली होती. तक्रारदार यांचा पत्नी व सासरे यांच्यात जागा, प्लॉटचा वाद आहे. या वादासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता. तक्रार अर्जावरुन कारवाई न करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी दोन लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे एसीबीच्या पथकाने 25 मे 2022 आणि 2 जून 2022 पडताळणी केली.
पडताळणी दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे कारवाई न
करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पुणे एसीबीने गुरुवारी (दि.24) कोंढवा पोलीस ठाण्यात स्वराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पुणे एसीबी युनिटचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title :- Pune ACB Trap | FIR by anti-corruption against assistant police inspector in Pune who demanded a bribe of two lakhs

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | उध्दव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, म्हणाले – ‘वृध्दाश्रमात जागा नसणार्‍यांना राज्यपाल नेमलं…’

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; द गेम चेंजर्स संघाचा सलग दुसरा विजय

Sharad Pawar On Maharashtra Karnataka Border Issue | ‘बेळगाव, कारवार आणि निप्पाणी देणार असाल, तर ‘जत’च्या ठरावावर चर्चा करु’ – शरद पवार

Related Posts