Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune ACB Trap | केसमधून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी २ लाखांची लाच मागून त्यापैकी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना शिवाजीनगर न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune ACB Trap)
सचिन अशोक देठे Sachin Ashok Dethe (वय ३९, रा. राजगुरुनगर, खेड- Rajguru Nagar- Khed) असे या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील (Shivaji Nagar Court, Pune) गणेश झेरॉक्स या दुकानासमोर गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. (Pune ACB Trap)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबतची अधिक माहिती अशी, एका २३ वर्षाच्या विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
त्यांच्या मावसभावाविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्यातून सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करण्यासाठी व निकाल मार्गी लावण्यासाठी शिवाजीनगर सत्र न्यायालयातील क्लार्क सचिन देठे यांच्याकडे ३० नोव्हेबर रोजी २ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्याची पडताळणी केली, त्यात देठे याने दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर गुरुवारी रात्री शिवाजीनगर न्यायालयाबाहेर सापळा लावण्यात आला. तक्रारदार याच्याकडून दीड लाख रुपये स्वीकारताना देठे याला पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune ACB Trap | Senior Clerk of Shivajinagar Court in anti-corruption net while accepting bribe
Pune Crime | खिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून पत्नीला मारहाण; देवाच्या मूर्ती, फोटो नदीत बुडविले
Comments are closed.