IMPIMP

Pune Accident-Crime | बारामतीजवळ झालेल्या भीषण अपघातात सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे जागीच ठार; अश्विनी भंडारी, मिलिंद भंडारी आणि कविता शहा यांचा समावेश

by nagesh
Pune Accident-Crime | major accident in baramati three died on the spot pune accident crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Accident-Crime | ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने धडक दिल्याने झालेल्या
भीषण अपघातात बारामतीतील सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघे ठार झाले. हा अपघात पुणे -बारामती रस्त्यावर (Pune-Baramati Road)
तरडोली गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अश्विनी श्रेणिक भंडारी (वय ४८), मिलिंद श्रेणिक भंडारी (वय २४), कविता उदय शहा (वय ६२, सर्व रा. सुभाष चौक, बारामती) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. तर बिंदिया सुनिल भंडारी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बारामतीतील सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी यांचे कुटुंबीय एका धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. रात्री कार्यक्रम संपवून ते बारामतीला परत जात होते. यावेळी तरडोलीपासून पुढे आल्यानंतर ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज न आल्याने वेगात असलेल्या कारने ट्रॉलीला मागून जोरात धडक दिली (Pune Accident-Crime). ही धडक इतकी जोरात होती की, त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातातील जखमींना पुण्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेने बारामतीत शोककळा पसरली आहे.

Web Title : Pune Accident-Crime | major accident in baramati three died on the spot pune accident crime

हे देखील वाचा :

Pune Crime | निकृष्ट बांधकाम करुन पोलिसाच्या पैशाचा अपहार करणार्‍या विनायक डेव्हलपर्सच्या विनायक शिरोळे, अविनाश शिरोळे, निखील शिरोळे, सचिन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

Nana Patole | ‘नाना पटोलेंची जीभ छाटा अन् 1 लाख बक्षीस मिळवा’; भाजपचा आक्रमक पवित्रा

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

Related Posts