IMPIMP

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

राजगुरुनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Accident News | हॅलो महाराष्ट्र -आजकाल अपघाताच्या (Accident) अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राजगुरुनगर येथील हृदय हिरावून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात दुचाकी वर आईच्या कुशीत बसून निघालेल्या सहा महिन्याच्या मुलीचा (Six Month Baby) मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने राजगुरुनगर (Rajgurunagar) शहराच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा अपघात (Pune Accident News) वाडा रस्त्यावर एका कापड दुकानासमोर भर दुपारी घडला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मृत बाळाचे वडील हे दुचाकी चालवत होते. अशातच गर्दी असल्याने वाहने पुढे सरकत नव्हती. यातूनच मागून आलेल्या ट्रॅक्टरचा (Tractor) दुचाकीला धक्का बसला. या धक्क्यामध्ये पत्नीच्या हातातील मुलगी खाली पडली आणि काही कळण्याच्या आतच ही चिमुरडी ट्रॅकटरच्या चाकाखाली गेली. याबाबत वडील कैलास चिंतामणी आढळ (Kailas Chintamani Aadhal) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेत कोवळ्या जीवाचा काहीच दोष नव्हता असे म्हणत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. (Pune Accident News)

सदर ट्रॅक्टर हा विशाल भांबुरे (Vishal Bhambure) राहणार भांबुरवाडी तालुका खेड याचे असल्याचे समोर आले आहे.
त्यानुसार पोलिसात त्यांच्या विरोधात तक्रार देखील करण्यात आली आहे.
सखोल चौकशी करून चूक कोणाची यावर तक्रार नोंदवली जात असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव
(Police Inspector Satish Kumar Guruv) यांनी सांगितले.
वाडा रस्ता हा मोठ्या वरदळीचा रस्ता बनला आहे.

Web Title :- Pune Accident News | six month baby died in accident in wada rajgurunagar pune

हे देखील वाचा :

Pune Crime | उधारीचे पैसे मागितल्याने व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा परिसरातील घटना

Mumbai-Goa Highway | अंजनारी पुलावरून गॅस टँकर कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts