IMPIMP

Pune Accident News | अष्टविनायक महामार्गावर काळाचा कुटुंबियांवर घाला; ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 3 जण ठार

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

दौंड : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. सदर घटना शुक्रवारी ( दि. २ नोव्हें) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली असून या अपघातात मृत्यु पावलेल्यांमध्ये पाटस येथील पुनर्वसन येथे राहणारे संतोष सदाशिव साबळे, त्यांच्या पत्नी रोहिणी साबळे आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा गुरू साबळे यांचा समावेश आहे. साबळे कुटुंबियांवर अचानकपणे काळाने झडप घातल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Pune Accident News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हाती आलेल्या माहितीनुसार, पाटस येथील रहिवासी संतोष साबळे हे आपल्या कुटुंबियांसोबत कुसेगाव येथील श्री भानोबा देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटस येथील विश्वशांती बुद्ध विहार येथील केनाॅलवरील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीसमोर मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. (Pune Accident News)

धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरून जाणाऱ्या साबळे कुटुंबियांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताविषयी अधिक माहिती विचारली असता कुसेगाव येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त असते, शिवाय येथील रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांचा सुद्धा वेग जास्त असतो परिणामी त्याचा फटका दुचाकीवाल्यांनी बसत असल्याची खंत तेथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे पोलिस सहायक निरीक्षक केशव बावळे,
समीर भालेराव, एस आर सुपेकर, सागर चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Accident News | three killed in the same family in patus daund taluka pune accident news

हे देखील वाचा :

Pune Health News | चिंताजनक ! पुण्यात आढळला ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वराचा रुग्ण

Salman Khan | सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केले ‘हे’ गंभीर आरोप

Sushma Andhare | ‘लढाई दोन वाघांची आहे ना; मग कुत्रे का फायदा घेत आहेत?’ – सुषमा अंधारे

Related Posts