IMPIMP

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

by nagesh
Pune Accident News | Two students of MIT College in Pune died in a horrific accident, incident at Narayangaon

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन  पुण्यातील (Pune) नारायणपूरमध्ये (Narayanpur) एक भीषण अपघात (Pune Accident News) झाला आहे. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन मुलींचा समावेश आहे. नारायणपूर, ता पुरंदर, जि पुणे येथील सासवड – कापूरहोळ रस्त्यावरील (Saswad – Kapurhol Road) दत्तमंदीराशेजारी एका महिद्रा कंपनीच्या XUV 300 गाडीचा भीषण अपघात (Pune Accident News) झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय घडले नेमके?

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देऊन पलटी झाली. हा अपघात (Pune Accident News) एवढा भीषण होता कि यामध्ये गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरतनाना क्षिरसागर यांनी तातडीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून तातडीने सासवड ग्रामीण रूग्णालयात (Rural Hospital, Saswad) दाखल केले.

या अपघातात रचित मोहता (Rachit Mohta) व गौरव लालवानी (Gaurav Lalwani)
यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर पाच जणांना पुढील उपचारकामी ससुन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ससुन रूग्णालय या ठिकाणी उपचार चालू आहेत.
हे सर्व विद्यार्थी विविध राज्यातील असून ते सर्वजन MIT कॉलेज कोथरूड, पुणे या ठिकाणी शिक्षण घेत होते.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप
(Investigating Police Inspector Annasaheb Gholap) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप निरीक्षक विनय झिंजुर्के (Sub Inspector of Police Vinay Zinjurke) करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Accident News | Two students of MIT College in Pune died in a horrific accident, incident at Narayangaon

हे देखील वाचा :

Latur ACB Trap | प्रधानमंत्री पीक विम्याच्या कामासाठी लाच घेणारे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दोन प्रतिनिधी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

T20 World Cup 2023 वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना

Related Posts