IMPIMP

Pune Band | पुणे बंद आंदोलन ! 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय

by nagesh
MPSC Students Protest in Pune | mpsc students protest in pune to avoid new syllabus in 2023 and other seeking

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज
(Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ 13 डिसेंबर रोजी राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुणे बंदची
(Pune Band) हाक दिली आहे. पुणे बंदमध्ये (Pune Band) पुणे व्यापारी महासंघाने (Pune Trade Federation) सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची
माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (President Fattechand Ranka) आणि सचिव महेंद्र पितळीया (Secretary Mahendra Pitlia) यांनी
दिली.

संभाजी बिग्रेड (Sambhaji Bigrad), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shiv Sena), आर.पी.आय. (R.P.I.) या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला (Pune Band) पाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पुणे बंदमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी तीनपर्य़ंत दुकाने बंद ठेऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

याप्रसंगी अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, नितीन काकडे, अरविंद कोठारी,
सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव मिलिंद शालगर, राहुल हजारे उपस्थित होते.

Web Title :- Pune Band | Pune bandh movement! Pune Traders Federation’s decision to keep shops closed till 3 pm on December 13

हे देखील वाचा :

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार महिला पोलिसाची भूमिका

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | उरूळी देवाची आणि फुरसंगी येथील टी.पी. स्किम आणि कचरा डेपो आमच्याकडेच राहू द्यावा; पुणे महापालिका करणार शासनाला विनंती

Manoj Bajpayee | अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन; वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

Related Posts