IMPIMP

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

by nagesh
Pune Bar Association Elections | Pune Bar Association President Adv. Ketan Kothavle as Vice President Adv. Vishwajit Patil and Adv. Jayshree Chaudhary - Beedkar won

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Bar Association Elections | पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे हे अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Court, Pune) सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. (Pune Bar Association Elections)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांचा १ हजार २३० मतांनी पराभव केला. कोठावळे यांना २ हजार ७२८ मते मिळाली.

उपाध्यक्षपदाच्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना ३ हजार १० तर, अ‍ॅड. जयश्री चौधरी -बीडकर यांना २ हजार २३४ मते मिळून ते विजयी झाले. अ‍ॅड. राहुल कदम यांना २ हजार ७१९ व अ‍ॅड. गंधर्व कवडे हे २ हजार ४९१ मते मिळवून सचिवपदी विजयी झाले. खनिजदारपदाच्या लढतीत अ‍ॅड. समीर बेलदरे यांनी २ हजार ७९१ मते मिळवत विजय मिळविला. अ‍ॅड. अजय देवकर यांची  ऑडिटर म्हणून निवड झाली आहे. (Pune Bar Association Elections)

बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. त्यात अमोल वडगणे, प्रमोद नढे, मयुरी कासट, संजय खैरे, रेश्मा चौधरी, श्रद्धा जगताप, राहुल प्रभुणे, ऋषिकेश कोळपकर, चंद्रसेन कुमकर, सचिन माने अशी कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत.

अ‍ॅड. अमित गिरमे यांनी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांना अ‍ॅड. दिलीप जगताप, अ‍ॅड. माधवी पोतदार, अ‍ॅड. शरद कुलकर्णी,
अ‍ॅड. कांताराम नप्ते आणि अ‍ॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणुक अधिकारी म्हणून मदत केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Bar Association Elections | Pune Bar Association President Adv. Ketan Kothavle as Vice President Adv. Vishwajit Patil and Adv. Jayshree Chaudhary – Beedkar won

हे देखील वाचा :

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Pune Crime News | ‘आम्ही जनता वसाहतीमधील भाई, खेकडा गँगच्या नादी लागला तर…’, मुलीकडे बघितल्याच्या संशयावरुन शाळकरी मुलावर कोयत्याने वार

Related Posts