IMPIMP

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी

by nagesh
Pune By Elections | maha vikas aghadi tussle for kasaba peth bypoll election in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune By Elections | चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasba by-Elections) जाहीर झाली आहे. भाजपने (BJP) दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक (Pune By Elections) बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. मात्र, महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दोन्ही ठिकाणची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) दावा केला आहे. याठिकाणी तिन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची यादी मोठी झाली आहे. त्यामुळे कसब्यातून कोणत्या पक्षाला आणि कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच काँग्रेसने दावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेने देखील निवडणूक (Pune By Elections) लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या डझनभर इच्छुक उमेदवारांची यादी आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत दहा जणांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा मतदारसंघ जरी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असला तरी याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकुश काकडे (Ankush Kakade), अण्णा थोरात (Anna Thorat), रवींद्र माळवदकर (Ravindra Malvadkar), गणेश नलावडे (Ganesh Nalavde), वनराज आंदेकर (Vanraj Andekar), रुपाली पाटील (Rupali Patil), शिल्पा भोसले (Shilpa Bhosle), दत्ता सागरे या प्रमुख नावांसह एकूण दहा इच्छुकांची नावे आहेत. ही नावे प्रदेश कार्यालयात पाठवण्यात आली आहेत. महाविकास विकास आघाडीतील तिनही पक्ष सध्या कसब्यातील जागेवर दावा करत आहेत.

काँग्रेसकडून जोरदार तयारी
काँग्रेसने कसबा विधानसभेवर दावा करत जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसमध्ये देखील इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे.
आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thope) यांनी 16 जणांची ऑनलाइन मुलाखत घेतली.
यामध्ये अरविंद शिंदे (Arvind Shinde), रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar),
कमल व्यवहारे (Kamal Vyavaye), नीता राजपूत (Neeta Rajput), संगिता तिवारी (Sangita Tiwari),
विजय तिकोणे (Vijay Tikone) यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune By Elections | maha vikas aghadi tussle for kasaba peth bypoll election in pune

हे देखील वाचा :

Budget 2023 | मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Budget 2023 | ‘या’ आहेत मोदी सरकारच्या शिक्षणक्षेत्रासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

Pune Crime News | दहशत माजवणाऱ्या पुण्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची दुसरी कारवाई

Related Posts