IMPIMP

Pune Child Sexual Abuse Case | बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात निवृत्त IAS अधिकारी मारुती सांवंत यांना पाच वर्षाची शिक्षा

by nagesh
une Child Sexual Abuse Case | pune former director general maruti sawants Punishment and fine in sinhagad road police station child sexual abuse case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Child Sexual Abuse Case | भारतीय प्रशासकीय सेवेअंतर्गत (Indian Administrative Service (IAS) कृषी परिषदेचे माजी महासंचालक मारुती हरी सावंत (Maruti Hari Sawant) याला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात (Pune Child Sexual Abuse Case) जिल्हा व सत्र न्यायालय पुणे (District and Sessions Court) यांनी आज (दि.6) पाच वर्षे शिक्षा व दहा लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी मारुती हरी सावंत याने लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे मार्च महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर पीडित मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपी मारुती हरी सावंत याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station) येथे भा.द.वि.कलम ३७६(अ), ३५४(अ) (ब),५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा २०१२चे कलम ४,६,८,१० तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अ. प्र) अधिनियम १९८९ चे कलम ३(१) (अकरा)(बारा), ३(२) (पाच)व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम६७(अ), ६७(ब) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हयाचा तपास तत्कालीन स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त (Swargate Division ACP) आणि सध्याचे पुणे ग्रामीणचे (Pune Rural Police) अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (Addl SP Milind Mohite) यांनी केला आहे. (Pune Child Sexual Abuse Case)

दरम्यान, आरोपीने कोरोना महामारी तसेच वय 65 पेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या दि.१२ मे २०२१ च्या शिफारसीस अनुसरून तात्पुरता
जामीन (Bail) मिळावा म्हणून मे. कोर्टात अर्ज केला होता त्यास
विशेष सरकारी वकील ऍड. प्रताप परदेशी (Special Government Advocate Adv. Pratap Pradesh)
यांनी विरोध केला व आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकार समितीच्या शिफारसीस अनुसरून नसून
आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व सदरील गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जमीन
अर्ज नामंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद केला तो कोर्टाने मान्य केला व आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Child Sexual Abuse Case | pune former director general maruti sawants Punishment and fine in sinhagad road police station child sexual abuse case

हे देखील वाचा :

Pune PMC News | राज्यातील सत्ता बदलाचा असाही परिणाम ! केबल डक्टच्या कामाचे 12 कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेवर ‘राजकिय’ प्रेशर; अखेर महापालिकेने ‘देणे’ भागवून उत्पन्न मिळविण्यासाठी निविदा काढल्या

Pune PMC News | केशवनगर येथे गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीररित्या व्यावसायीक वापर ! बोगस पुराव्यांच्या आधारे जागा मिळवून देणार्‍या ‘दलालांचा’ सुळसुळाट

Related Posts