IMPIMP

Pune Collector Office | वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत, व्हायरल व्हिडिओबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

by nagesh
Pune Collector Office | the storm didnt blow the papers out explanation of pune collectorate

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  नुकत्याच (30 सप्टेंबर रोजी) झालेल्या वादळी पावसादरम्यान (Stormy Rains) वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Pune Collector Office) छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले असले तरी या वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील (Pune Collector Office) कोणतीही कागदपत्रे अथवा नस्त्या (फाईल्स) उडाल्या नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

30 सप्टेंबर 2022 रोजी आलेल्या वादळामध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे या आभासी छताचे बरेचसे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले. सदरचे पॅनल्स वादळात उडतानाची चित्रफित समाज माध्यमांवर (Social Media) प्रसारित Video Viral (व्हायरल) झाली. वादळात उडणारे पॅनल्स नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Pune Collector Office) नस्ती (फाईल्स) उडाल्या असा गैरसमज सर्वत्र पसरला. तथापि, या वादळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कागदपत्रे, फाईल्स उडाल्या नाही तसेच इमारतीस कुठेही बाधा पोहोचलेली नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तुमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चार विंग आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ विंगमध्ये विविध कार्यालये ‘क’ विंगमध्ये जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांची दालने व 350 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह आणि ‘ड’ विंगमध्ये 4 मजली वाहनतळ अशा इमारती आहेत. वाहनतळाच्या इमारतीमधून कर्मचारी व अभ्यागतांना विविध कार्यालयामध्ये येण्यासाठी 5 मजल्यावर कॉरीडॉर ची व्यवस्था केलेली आहे. सदर कॉरीडॉर्स च्या आर.सी.सी स्लॅबखाली आभासी छत (फॉल्स सिलिंग) केलेले आहे.

आता कॉरिडॉर्समधील (Corridor) सर्व आभासी छत फ्रेमवर्कसह व्यावस्थितरित्या काढून घेण्यात येतील.
त्यातील क्षतिग्रस्त झालेले पॅनल्स वगळता उर्वरित चांगले पॅनल्स सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत
नजीकच्या भविष्यात बांधकामे प्रगतीत असलेल्या इमारतींच्या कार्यालयीन कक्षामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी वापरण्यात येतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Collector Office | the storm didnt blow the papers out explanation of pune collectorate

हे देखील वाचा :

Kolhapur Wrestler Died | धक्कादायक! कोल्हापुरमध्ये पैलवानाचा सरावादरम्यान मृत्यू

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हाध्यक्षाचा ई-मेलवरुन राजीनामा

Shivsena | धनुष्यबाण कुणाला मिळणार सेना की शिंदे गट? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली ही डेडलाईन

Related Posts