IMPIMP

Pune Congress | चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवणार ‘खुळखुळा’ दिवाळी भेट, काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले – ‘ते राजकारणाला खेळ…’

by nagesh
Chandrashekhar Bawankule | ncp will not get candidates in the future criticism of chandrasekhar bawankule baramati pune print news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सातत्याने टीका करणारे भाजपानेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त पुण्यातील काँग्रेस (Pune Congress) कार्यकर्ते बाळाचे खुळखुळे भेट पाठवणार आहेत. साकोल्यात काँग्रेसचा (Pune Congress) पंजा थांबवायचा आहे, बारामतीत राष्ट्रवादीचं (NCP) घड्याळ बंद पाडायचंय, आणि वरळीमध्ये समुद्राच्या पाण्याने मशाल विझवायचीय, अशी वक्तव्य बावनकुळेंनी केल्याने त्यांना खुळखुळ्याचं दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळणार आहे. काँग्रेस पक्षाकडून पोस्टाने चंद्रशेखर बावनुकळे यांच्या निवासस्थानी हे खुळखुळे पुण्यातून पाठवले जाणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रत्येक कार्यक्रमात आक्रमक वक्तव्य करुन मविआ नेत्यांना डिवचणार्‍या बावनकुळेंवर काँग्रेस (Pune Congress) कार्यकर्त्यांनी आपला राग अशाप्रकारे व्यक्त केला आहे. बावनकुळेंना प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या रोहन सुरवसे (Rohan Suravse) यांनी या दिवाळीला बावनुकळे यांना भेट म्हणून खुळखुळे दिले आहेत.

याबाबत रोहन सुरवसे यांनी म्हटले की, चंद्रशेखर बावनकुळे यांची विधाने मोठी असतात, पण ते करत काहीच नाही. ते महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहता त्यांनी थोडे तारतम्य बाळगावे. त्यांनी बोलताना विचार करावा. राजकारणात एखादी गोष्ट बोलली की ती पूर्ण करणे लहान मुलांचा खेळ नाही. परंतु चंद्रशेखर बावनकुळे खेळ समजून अशाप्रकारची विधाने करत असल्याने त्यांना आम्ही खुळखुळे भेट देत आहोत.

पुण्याच्या ग्रामीण भागातील खेड आळंदी विधानसभा मतदार संघात (Khed Alandi Assembly Constituency) भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटले होते की, 2024 मध्ये घड्याळ बंद पाडायचे आहे, म्हणजे बारामती बंद होईल.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कात्रज दुध संघाचे माजी संचालक शेखर शेटे, खेड पंचायत समितीचे माजी
सभापती कल्पना गवारी, माजी आमदार नारायण पवार यांची मुलगी प्रिया पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या कार्यक्रमात बावनकुळे म्हणाले होते की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे.
आजचा आवाज सिल्वर ओकवर जाणार. बावनकुळे यांच्या अशा वक्तव्यावर संतापलेल्या पुण्यातील काँग्रेस
कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खुळखुळ्यांची दिवाळी भेट पाठवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Pune Congress | congress leader rohan survase slams bjp maharashtra president chandrashekhar bawankule

हे देखील वाचा :

MCA Election | एमसीए निवडणुकीत पवार-शेलार पॅनलने मारली बाजी, अमोल काळे MCA चे नवे अध्यक्ष

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, त्यांना सातत्याने झटके येत आहेत – रुपाली ठोंबरे पाटील

Pune Crime | भरती प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी उपसंचालकासह तिघांवर FIR; अल्पवयीन मुलाला दिली नियुक्ती

Related Posts