IMPIMP

Pune Congress | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘सेवा कर्तव्य सप्ताह’; 500 ब्लँकेटचे वाटप

by nagesh
Pune Congress | 'Service Duty Week' in Pune on the occasion of Sonia Gandhi's birthday; Distribution of 500 blankets

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा 9 डिसेंबर रोजी वाढदिवस असून, यानिमित्ताने पुणे काँग्रेसच्या (Pune Congress) वतीने ‘सेवा कर्तव्य सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा कर्तव्य सप्ताहांतर्गत’ पुणे शहर महिला काँग्रेसच्या (Pune Congress) वतीने मध्यरात्री पुण्यातील काँग्रेस भवन (Congress Bhawan), पुणे स्टेशन (Pune Station), माल धक्का या परिसरातील गोरगरिबांना पूजा आनंद (Pooja Anand), मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या हस्ते 500 उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या थंडीचे दिवस असून रस्त्यावर झोपणारे नागरिक गारठलेले दिसून आले. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांकडे थंडीतून बचावासाठी काही कपडे व पांघरूण नव्हते. अशा वेळी मिळालेल्या ब्लँकेटमुळे सर्व जण आनंदी झाले. प्रत्येकजण मिळालेले ब्लँकेट आपल्या अंगावर टाकून गरम ऊबेचा आनंद घेताना दिसून आले. सोनिया गांधी यांचा 76 वा वाढदिवस रस्त्यावरील लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वांनी सोनिया गांधी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. (Pune Congress)

‘हॅपी बर्थडे टू सोनियाजी’ म्हणत केक कापला. याप्रसंगी मोहन जोशी, पूजा आनंद, जयश्री कांबळे, गीता तारू,
अश्विनी गवारे, प्रशांत शुरसे, स्वाती शिंदे, रेश्मा शिलेगावकर, राजश्री अडसूळ, अंजू सोलापुरेकर, माया डुरे,
श्रीधर चव्हाण, साकुईब शेख, प्रवीण पिल्ले, शिवराज हुले, सचिन पाटोळे, अजय यादव, विनय स्वामी, गणेश मोरे,
रोहित पिल्ले, प्रदीप यादव उपस्थित होते. ब्लँकेट वाटपाचे आयोजन पूजा आनंद (अध्यक्ष, पणे शहर महिला काँग्रेस)
यांनी केले.

Web Title :- Pune Congress | ‘Service Duty Week’ in Pune on the occasion of Sonia Gandhi’s birthday; Distribution of 500 blankets

हे देखील वाचा :

Pune Congress | ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल – सतेज पाटील

Pune Crime | कोंढवा परिसरात गुन्हे शाखेचा छापा; नायजेरियन नागरिकाकडून 2 कोटींचे कोकेन जप्त

Maharashtra Police Inspector Transfer | राज्य पोलिस दलातील तब्बल 225 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Related Posts