IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 169 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. मंगळवारी (दि. 12) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरात कोरोना बाधित 115 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरात 5 लाख 2 हजार 666 पुणेकरांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 92 हजार 319 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. पुणे शहरात (Pune Corona) दैनंदिन रुग्णांच्या (New patient) संख्येत घट झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 115 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 169 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरामध्ये आजपर्यंत 34 लाख 48 हजार 391 जणांची कोरोना चाचणी (Pune Corona) करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 2 हजार 666 जण कोरोना बाधित (Corona-infected patients) आढळून आले आहे. यापैकी 9056 जणांचा मृत्यू झाला असला तरी, यातील बहुतांश रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त होते. आजपर्यंत 4 लाख 92 हजार 319 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये सक्रिय (Active patient) रुग्णसंख्या 1 हजार 291 इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवारी (दि.12) 115 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 390 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
आज दिवसभरात 169 कोरोनामुक्त झाले आहेत तर 05 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापैकी 2 पुणे शहरातील आहेत तर 3 जण पुण्याबाहेरील आहेत.
शहरामध्ये 186 गंभीर रुग्ण असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 219 इतकी आहे.

Web Title :- Pune Corona | 169 corona patients discharged in Pune city in last 24 hours; Learn other statistics

हे देखील वाचा :

Bitcoin | बिटकॉइनने एक आठवड्यात घेतली 16% आघाडी ! 57000 डॉलरच्या पुढे, इतर डिजिटल टोकन आले खाली

Pune Crime | जागेच्या वादातून 5 जणांना कोयता व काठीने मारहाण, 8 जणांवर FIR

Pune Corporation | काय सांगता ! होय, प्लास्टिक-काचेच्या बाटल्या आणि रॅपर्स कचर्‍यात फेकू नका ! पुणे महापालिका ‘त्या’ विकत घेणार, जाणून घ्या दर

Related Posts