IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by bali123
Pune Corona | 221 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. रुग्ण संख्येत घट झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 221 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 254 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Pune Corona) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 665 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 678 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8879 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2108 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2108 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 209 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8733 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 30 लाख 54 हजार 624 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.57 %

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 3 हजार 14 रुग्णांपैकी 10 लाख 76 हजार 181 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 8 हजार 377 आहे.
कोरोनाबाधित एकूण 18 हजार 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.57 टक्के आहे.

Web Title : Pune Corona | 221 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

Ganesh Utsav | लसीचे 2 डोस घेतलेल्यांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी

Crime News | पोलिसाने केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग; पोलीस तडकाफडकी निलंबित

Ajit Pawar | ‘या’ मुद्यावरून अजित पवार भडकले; म्हणाले – ‘आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नाही’ 

Related Posts