IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 88 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यात कोरोना (Pune Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मृतांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला (Pune Health Department) यश आल्याच्या पहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) केले जात आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात कोरोनाचे 88 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 95 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

शहरात गेल्या 24 तासात 4 हजार 628 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 88 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 36 लाख 68 हजार 781 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 6 हजार 379 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 96 हजार 421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 857 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या (Pune Corona) मृत्यूची नोंद झालेली नाही.
मात्र, शहराबाहेरील तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरात 97 रुग्ण गंभीर आहेत. तर 65 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Pune Corona | 88 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी

Pune Crime | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचे खरे कारण आले समोर, जाणून घ्या

Tim Southee | न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीने तोडले 42 वर्षाचे जुने रेकॉर्ड; 5 विकेट घेणार ठरला पहिलाच गोलंदाज

Related Posts