IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – पुणे शहरामध्ये मंगळवारी (दि.23) 100 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 389 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची संख्या 836 इतकी झाली आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 097 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 96 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 67 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 36 लाख 54 हजार 900 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 06 हजार 106 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 96 हजार 173 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Corona | Diagnosis of 100 patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Railways चा मोठा निर्णय ! आता कुणीही भाड्याने घेऊन चालवू शकतं ‘ट्रेन’, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

Hrishikesh Deshmukh | हृषीकेश देशमुखांचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग; ED चे PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर

Related Posts