IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्येत चढ – उतार पाहायला मिळत आहे. शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 12 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 099 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 697 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 52 हजार 132 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 217 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये एक रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहे.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर एकही रुग्ण नाही. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 2.76 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title :- Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

हे देखील वाचा :

Narayan Rane vs Vinayak Raut | ‘नारायण राणे आणि नितेश राणे यांचा राजकीय इन्शुरन्स संपलाय’ – शिवसेना खा. विनायक राऊत

Diabetes Superstar Foods | डायबिटीजच्या रूग्णांसाठी ‘हे’ आहेत 7 हेल्दी सुपरफूड्स, येथे पहा यादी

Kolhapur North By-Election BJP | कोल्हापूर उत्तरमधून धनंजय महाडिक समर्थक सत्यजित कदम यांना भाजपची उमेदवारी

Related Posts