IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona Update) दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 41 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 679 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 480 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 446 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 686 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 11 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर एकही रुग्ण नाही.
सध्या शहरामध्ये व्हेंटीलेटर बेड 513 आणि ऑक्सिजन बेड 4137 उपलब्ध आहेत.
एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 3.93 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title :- Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2022 | यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला काय मिळालं?; वाचा एका क्लिकवर !

Police Suspended | विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 3 पोलिसांसह 1 होमगार्ड निलंबित

Pune Crime | नारायणगाव येथील खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक; गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त

Related Posts