IMPIMP

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीत आज (मंगळवार) कोरोनाच्या नवीन (Pune Corona Updates) 4 हजार 866 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच जुन्या सॅम्पल्समधील 1454 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना (Pune Corona Updates) मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहरात आजपर्यंत 5 लाख 69 हजार 828 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरात 3381 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 22 हजार 669 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर शहराबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 152 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 38 हजार 007 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
30 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 27 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 14,998 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Corona Updates | Diagnosis of 4866 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

PM Awas Yojana Pune | प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद – हेमंत रासने

PMPML | पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

Akshay Kumar Wedding Anniversary | लग्नाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासाठी लिहिली पोस्ट, म्हणाला…

Related Posts