IMPIMP

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात 3959 नवीन रुग्णांचे निदान, मृतांचा आकडा वाढला; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत आज (सोमवार) कोरोनाच्या नवीन (Pune Corona
Updates) 3 हजार 959 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसागणिक पाच हजारांच्यावर कोरोना रुग्णांची (Pune
Corona Updates) संख्या वाढत होती. आज यामध्ये घट झाली आहे. आज रुग्ण संख्या घटली असताना मृतांची संख्या वाढली आहे. आज शहरात 12
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहरात आजपर्यंत 5 लाख 63 हजार 508 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरात 3067 रुग्ण बरे
झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 19 हजार 288 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर शहराबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 147 जणांचा कोरोनामुळे
मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 35 हजार 073 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 214 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
26 रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 20 नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 15,630 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 41 लाख 22 हजार 244 तपासणी करण्यात आल्या आहेत.

Web Title :- Pune Corona Updates | In Pune, 3959 new patients were diagnosed in the last 24 hours, the death toll rose; Learn other statistics

हे देखील वाचा :

Pune Metro | …म्हणून शरद पवारांनी मेट्रोतून प्रवास केला; महामेट्रोनं सांगितलं

Pune Crime | पुण्यातील यवतमध्ये गॅस कटरने महाराष्ट्र बँकेचे ATM फोडले, चोरट्यांचा भल्या पहाटे 23 लाखांवर डल्ला

MLA Ravi Rana | आमदार रवी राणा यांचा सूर बदलला ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता भाजपवर निशाणा..

7th Pay Commission | खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी एका भत्त्याची होणार वाढ; जाणून घ्या

Related Posts